Join us

जेनेलियाला रितेशचा अभिमान

By admin | Updated: August 2, 2015 23:54 IST

रि तेश देशमुखचा आगामी चित्रपट ‘बैंगिस्तान’ ७ आॅगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहे. ‘बैंगिस्तान’मधील रितेशचा अभिनय पत्नी जेनेलिया देशमुख

रि तेश देशमुखचा आगामी चित्रपट ‘बैंगिस्तान’ ७ आॅगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहे. ‘बैंगिस्तान’मधील रितेशचा अभिनय पत्नी जेनेलिया देशमुख हिला प्रचंड आवडला, असे ती सांगते. चित्रपट प्रदर्शित होण्याअगोदरच तिने चित्रपट पाहिला आणि ती ट्विटवर म्हणते, ‘काल रात्री चित्रपट पाहिला.. बैंगिस्तान! माझा नवरा असल्यामुळे कदाचित मी पक्षपाती मत देऊ शकते; पण रितेश मला दरवेळी चित्रपट पाहताना तुझा अभिमान वाटतो. तसेच तिने पुलकित सम्राट आणि जॅकलीन फर्नांडिस यांचेही कौतुक केले. ती पुढे टिवट करते की, ‘पुलकित सम्राट खूप हुशार आणि चांगला आहे. त्यासोबतच जॅकलीननेही सुंदर अभिनय केला आहे.’