Join us  

Big Boss Marathi 3 : गायत्री दातार म्हणते, आय लव्ह यू!!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2021 10:40 AM

‘बिग बॉस मराठी ३’च्या घरात गायत्री कोणत्या स्पर्धकाच्या प्रेमात गायत्री पडली आहे, असा प्रश्न अनेकांना पडला असेल. 

ठळक मुद्दे‘बिग बॉस मराठी ३’च्या घरात गायत्री कोणत्या स्पर्धकाच्या प्रेमात गायत्री पडली आहे, असा प्रश्न अनेकांना पडला असेल. 

अभिनेत्री गायत्री दातारच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. ती म्हणजे गायत्री सध्या प्रेमात पडली आहे. ‘बिग बॉस मराठी ३’च्या घरात गायत्रीची अनेक स्पर्धकांसोबत गट्टी जमली आहे. त्यामुळे या शोमधील कोणत्या स्पर्धकाच्या प्रेमात गायत्री पडली आहे, असा प्रश्न अनेकांना पडला असेल. 

गायत्रीच्या या प्रियकराचे नाव ऐकाल तर तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल. खुद्द बिग बॉस हे तिचे प्रियकर आहेत. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओच्या माध्यमातून याचा खुलासा झाला आहे. या व्हिडिओमध्ये ती आपल्या प्रियकराबरोबर प्रेमाच्या गोष्टी करताना दिसत आहे.  बिग बॉससमोर ती चक्क लाजतेय, त्यांच्यावर रुसतेय. आपल्या मनातल्या गोष्टी शेअर करतेय. एवढचं काय तर ‘बिग बॉस’ला आय लव्ह यू देखील म्हणत गायत्रीने प्रेमाची कबुली दिलीय.

टॅग्स :गायत्री दातारबिग बॉस मराठी