Join us

लग्नानंतर गौहर खानने केला मोठा खुलासा-आता बोल्ड सीन्स करणार नाही, सांगितले कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2021 16:27 IST

अभिनेत्री गौहर खान पर्सनल लाईफमुळे सध्या बरीच चर्चेत आहे.

अभिनेत्री गौहर खान पर्सनल लाईफमुळे सध्या बरीच चर्चेत आहे. गौहर खानने इस्माईल दरबार यांचा मुलगा जैद दरबारशी लग्न केले आहे. जैद हा अभिनेता, इफ्लूएंसर, कंटेट क्रिएटर आहे.सोशल मीडियावर त्याचे भरपूर फॉलोअर्स आहेत. लग्नानंतरही गौहर खान सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव्ह आहे. लग्नानंतर गौहर आपल्या प्रोफेशनल कमिटमेंट्स पूर्ण करते आहे. काही दिवसांपूर्वीच तिच्या 'तांडव' या वेबसिरीजचा ट्रेलर रिलीज झाला आहे. या सीरिजच्या प्रमोशन दरम्यान गौहर खानने आपल्या करियरशी संबंधित एक मोठा खुलासा केला आहे. यापुढे 'बोल्ड सीन' करणार नाही असा निर्णय तिने घेतला आहे.

गौहर खान अली अब्बास जफरची वेबसिरीज 'तांडव' मध्ये दिसणार आहे. अलीकडेच तिने हिंदुस्तान टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत म्हटले होते की, तिला बोल्ड सीन करायचे नसल्यामुळे तिने वेब शो नाकारले होते.

गौहर म्हणाली, 'मी पूर्णपणे ठाम आहे की मी बोल्ड सीन करणार नाही. कलाकार म्हणून माझे कर्तव्य आहे की मी पडद्यावर ज्या पात्राची भूमिका साकारत आहे त्याला पूर्णपणे न्याय देईन. ती म्हणाली की, 'मी फक्त एका प्रोजेक्टचा भाग होण्यासाठी माझी लाईन क्रॉस करणार नाही. 

टॅग्स :गौहर खान