Join us

घनगंभीर आवाजात गुलजार निवेदन

By admin | Updated: July 18, 2015 04:43 IST

गुलजार यांच्या घनगंभीर आवाजातील निवेदन मराठी चित्रपटात ऐकण्याची संधी ‘बायोस्कोप’च्या निमित्ताने मिळाली आहे. शुक्रवारपासून रिलीज झालेला ‘बायोस्कोप’ चार दिग्दर्शकांनी

गुलजार यांच्या घनगंभीर आवाजातील निवेदन मराठी चित्रपटात ऐकण्याची संधी ‘बायोस्कोप’च्या निमित्ताने मिळाली आहे. शुक्रवारपासून रिलीज झालेला ‘बायोस्कोप’ चार दिग्दर्शकांनी दिग्दर्शित केलेला वेगळा चित्रपट म्हणून ओळखला जातोय. तरलता हे त्याचे वैशिष्ट्य. या तरलतेचे शहेनशहा असलेले गुलजार यांचे निवेदन या चित्रपटाला वेगळीच खुमारी देत आहे. ‘ए जिंदगी गले लगा ले’, ‘ तेरे बिना जिंदगी से कोई’ अशी एकाहून अनेक सरस गाणी गुलजार यांनी लिहिली. त्यांनीच ‘बायोस्कोप’मधील चार कथा आपल्या निवेदनाने जोडल्या आहेत. कवितांवर आधारित या वेगळ्या कल्पनेचे गुलजार यांनी भरभरून कौतुक केले. गुलजार यांनी चित्रपटात गाणी लिहावीत, अशी प्रत्येकच कवीची इच्छा असते. मात्र त्यांनी केलेल्या निवेदनामुळे आमचा आनंद द्विगुणित झाला, अशी भावना दिग्दर्शक विजू माने, गिरीश मोहिते, रवी जाधव आणि गजेंद्र अहिरे यांनी व्यक्त केली.