Join us  

गली बॉय फेम सिद्धांत चतुर्वेदी लॉकडाउनमध्ये असा घालवतोय वेळ

By ऑनलाइन लोकमत | Published: May 07, 2020 6:00 AM

सिद्धांत चतुर्वेदीने गली बॉयमधून बॉलिवूडमध्ये केली एन्ट्री

गली बॉय चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारा अभिनेता सिद्धांत चतुर्वेदी याने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले. त्याने गली बॉय सिनेमात रॅपर एमसी शेरची भूमिका केली होती. या चित्रपटातील त्याच्या दमदार परफॉर्मेंसला अनेकांची पसंती मिळाली आणि तरूणांच्या मनात त्याने घर केले. 

सिद्धांत चतुर्वेदीने लॉकडाउनच्या काळातील आपल्या अनुभवाविषयी सांगताना म्हटले की, "या काळात मी आपल्या मुळांशी अधिक घट्टपणे जोडला गेलो असल्याचे मला जाणवते आहे. माझे आई वडील खूप खुश आहेत की मी त्यांच्यासोबत जास्तीत जास्त वेळ घालवतो आहे, जो गेली काही महिने मी त्यांच्यासोबत घालवू शकलो नव्हतो. या व्यतिरिक्त, मी आइसोलेशनमध्ये कम्फ़र्टेबल आहे,असे मी माझा सिनेमा येण्याआधी केले आहे." असेही तो पुढे म्हणाला. अभिनेत्याने केवळ आपल्या परफॉर्मेंसनेच सगळ्यांचे मन जिंकले आहे असे नाही, तर आपल्या मुळांसोबत जोडून राहणे आणि लॉकडाउनच्या काळात आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवणे, या दोन्ही गोष्टींनी प्रेक्षकांना प्रेरीत केले आहे.  सिद्धांत या लॉकडाउनच्या काळात प्रोड्यक्टिव बनून आपला दिवस घालवत आहेत आणि आपल्या प्रेक्षकांना देखील असे करण्यासाठी प्रेरीत करत आहेत.

सिद्धांत आगामी 'बंटी और बबली 2' सिनेमात दिसणार आहे ज्यामध्ये तो बंटीच्या मुख्य भूमिकेत दिसणार आहे. तसेच एक्सेल एंटरटेनमेंट आणि शकुन बत्राच्या आगामी चित्रपटात तो दीपिका पादुकोण आणि अनन्या पांडे यांच्या सोबत दिसणार आहे.

टॅग्स :गली ब्वॉयसिद्धांत चतुर्वेदीदीपिका पादुकोणअनन्या पांडे