Join us

चित्रपट एक अन् दिग्दर्शक चार!

By admin | Updated: January 30, 2016 03:05 IST

काही वर्षांपूवी दाक्षिणात्य सिनेमातील दिग्गज मणिरत्नम यांनी बाँबे टॉकीज नावाची आपली प्रोडक्शन कंपनी सुरू केली होती. या बॅनरखाली त्यांनी एक आगळावेगळा चित्रपट तयार करण्याची योजना

काही वर्षांपूवी दाक्षिणात्य सिनेमातील दिग्गज मणिरत्नम यांनी बाँबे टॉकीज नावाची आपली प्रोडक्शन कंपनी सुरू केली होती. या बॅनरखाली त्यांनी एक आगळावेगळा चित्रपट तयार करण्याची योजना आखली होती. ‘कॅप्टन’ नावाच्या या चित्रपटाचे वैशिष्ट्य म्हणजे चार दिग्दर्शकांची टीम हा प्रोजेक्ट पूर्ण करणार होती. कॅप्टनच्या चमूत मणिरत्नमसोबत शेखर कपूर, रामगोपाल वर्मा व मुकुल आनंद यांचा समावेश होता. विशेष म्हणजे मुख्य भूमिकेसाठी आमीर खानशी संपर्क करण्यात आला होता. मात्र काही कारणांमुळे हा प्रोजेक्ट पूर्ण होऊ शकला नाही. हा चित्रपट पूर्ण झाला असता तर सिनेमाच्या इतिहासात एक नवीन पान जुळले असते. एक ा चित्रपटासाठी एकापेक्षा जास्त दिग्दर्शकांना जोडणे कोणत्याही निर्मात्यासाठी कठीण काम होऊ शकते. विंधू विनोद चोपडा यांनी ‘१९४२ लव स्टोरी’ तयार करताना चार कॅमेरामॅनची टीमच तयार केली होती. हा चित्रपट त्यांना वेळेत तयार करायचा होता. त्यासाठी चार वेगवेगळे युनिट तयार करण्यात आले होते. प्रत्येक युनिटचा इंचार्ज वेगवेगळा होता. एका युनिटचे इंचार्ज स्वत: विनोद चोपडा होते, तर दुसऱ्या युनिटसाठी चित्रपटाचे कॅमेरामॅन बिनोद प्रधान होते. तिसऱ्या युनिटची जबाबदारी शेखर कपूरवर सोपविण्यात आली होती, तर चौथे युनिट गोविंद निहलानी यांच्या नेतृत्वात काम करीत होते. सतत तीन दिवसांपर्यंत या चारही दिग्गजांनी मिळून शूटिंगचे काम पार पाडले होते. वेगवेगळ्या शॉर्ट स्टोरीजवर आधारित चित्रपट नक्कीच वेगवेगळे दिग्दर्शक आणले गेले. करण जौहरच्या कंपनीतला चित्रपट ‘बाँबे टॉकीज’च्या चार वेगवेगळ्या कथांसाठी स्वत: करण जोहरने दिग्दर्शक अनुराग कश्यप, दीबांकर बॅनर्जी व जोया अख्तर यांची मदत घेतली होती. याप्रमाणेच संजय गुप्ताचा चित्रपट ‘दस कहानियाँ’मधील वेगवेगळ्या १० कहाण्यांसाठी संजय गुप्ताशिवाय अपूर्वा लखिया, मेघना गुलजार, रोहित राय, हन्सल मेहता आणि जसमीत डोढी यांना जोडण्यात आले होेते.

- anuj.alankar@lokmat.com