Join us

चार तरूणींनी 'दबंग' सलमानला लुटले

By admin | Updated: October 8, 2015 13:25 IST

बॉलिवूडडचा दबंग अभिनेता सलमानना चार तरूणीनी लुटले असून त्यांनी त्याचे वॉलेट, गॉगल व पेंडट पळवल्याची घटना मुंबईतील नाईटक्लबमध्ये घडली आहे.

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. ८ - मोठ्या पडद्यावर अनेकांना लीलया लोळवणारा बॉलिवूडचा 'दबंग स्टार' सलमान खानला ख-या आयुष्यात मात्र चार तरूणींनी लुटल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मुंबईतील एका नाईटक्लबमध्ये नुकताच हा प्रकार घडला असून चार सुंदर तरूणींनी आपण सलमानच्या सर्वात मोठ्या फॅन्स असल्याचे भासवत त्याचे वॉलेट, किमती गॉगल आणि प्रसिद्ध बजरंगी भाईजान पेंडट पळवले. 
एका इंग्रजी वृत्तपत्रानुसार, काही दिवसांपूर्वी सलमान एका नाईटक्लबमध्ये गेला होता, तेथे त्याला चार तरूणी भेटल्या. आम्ही तुझ्या खूप मोठ्या फॅन्स आहोत असे त्यांनी सांगितले. त्यांचा उत्साह पाहून सलमाननेही त्यांच्याशी  गप्पा मारल्या. मात्र थोड्या वेळाने त्या चौघीजणी निघून गेल्यावर सलमानला आपले वॉलेट व इतर सामान गायब असल्याचे लक्षात आले.
याबाबत पोलिसांकडे तक्रार नोंदवण्याचा सल्ला सलमानच्या अंगरक्षकाने दिला, मात्र तसे करण्यास नकार देत सलमानने आपल्या सुरक्षेत वाढ करण्याचा निर्णय घेतला. 
दरम्यान चित्रपट निर्माती व दिग्दर्शक नंदिता सिंघा हिने मात्र चोरीच्या या वृत्ताला दुजोरा दिला असून सलमानने आपल्या सुरक्षेत वाढ केल्याचा दावा केला आहे. पण सलमानची बहीण अर्पिताने मात्र असा कोणताही प्रकार घडला नसल्याचे म्हटले आहे. 'सलमान भाईला लुटणे ही काही सोप्पी गोष्ट नाही. आणि मुळात म्हणजे तो सध्या कोणत्याच नाईट क्लबमधये गेला नव्हता,' असे अर्पिताने सांगितले.