Join us
Daily Top 2Weekly Top 5

दिग्दर्शनात कंगनाचे पहिले पाऊल

By admin | Updated: August 30, 2014 04:28 IST

अभिनय आणि स्क्रिप्ट रायटिंगसह कंगना रनौटला दिग्दर्शनातही रस आहे. नुकताच कंगनाने एक शॉर्ट मुव्ही दिग्दर्शित केला

अभिनय आणि स्क्रिप्ट रायटिंगसह कंगना रनौटला दिग्दर्शनातही रस आहे. नुकताच कंगनाने एक शॉर्ट मुव्ही दिग्दर्शित केला असून, लवकरच ती हा चित्रपट विविध चित्रपट महोत्सवांसाठी पाठविणार आहे. काही वर्षांपूर्वी कंगना एका आॅस्ट्रेलियन टीमसोबत ‘द टच’ या शॉर्ट मुव्हीचे दिग्दर्शन करीत असल्याची बातमी आली होती; पण त्याबाबत काही खुलासा होऊ शकला नाही. नुक तेच तिच्या या शॉर्ट मुव्हीचे पहिले पोस्टर रिलीज झाले आहे. चित्रपट तयार असून सध्या फायनल एडिटिंगचे काम सुरू आहे. नऊ मिनिटांचा हा चित्रपट एका लहान मुलावर आधारित आहे.