ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ९ - अभिनेता सलमान खानच्या बहुचर्चित 'सुलतान'चा पहिला लूक जाहीर झाला आहे. खुद्द सलमाननेच ट्विटरवरून त्याच्या चित्रपटातील एक फोटो अपलोड केला असून आहे.
'ट्रेनिंगदरम्यान घेतलेला हा एक फोटो' अशी कॅप्शन देत सलमानने हा फोट शेअर केला असून त्यात तो छोटे केस आणि मिशी अशा लूकमध्ये दिसत आहे. या बहुचर्चित चित्रपटात सलमान हरियाणाचे कुस्तीपटू सुल्तान अली खान यांची भूमिका साकारत आहे. 'रेस्टलिंग हे काही युद्ध नाही, ती स्वत:च स्वत:सी केलेली लढाई आहे' अशी टॅगलआईन फोटोत दिसत आहे.
यशराज फिल्म्सच्या या चित्रपटाचे दिग्दर्शन अली अब्बास जफरने केले आहे.