Join us

अनुष्काचे पहिले आयटम साँग

By admin | Updated: October 21, 2014 00:19 IST

एका बाबतीत अनुष्का शर्मा सर्वांच्या मागे राहिली आहे. एकीकडे इतर अभिनेत्रींनी बरेच आयटम साँग त्यांच्या नावावर करून घेतले आहेत,

एका बाबतीत अनुष्का शर्मा सर्वांच्या मागे राहिली आहे. एकीकडे इतर अभिनेत्रींनी बरेच आयटम साँग त्यांच्या नावावर करून घेतले आहेत, तर अनुष्का आता पहिल्यांदाच आयटम साँग करणार आहे. चित्रपटाचे नाव आहे दिल धडकने दो आणि गाण्याचे बोल आहेत, स्विंग. या आयटम साँगमध्ये अनुष्का एकटीच दिसणार नसून तिच्यासोबत प्रियंका चोप्रा, फरहान अख्तर, अनिल कपूर आणि शेफाली शाह हे कलाकारही थिरकताना दिसतील. चित्रपटात रणवीर सिंह अनुष्काचा हीरो आहे; पण तो आयटम साँगमध्ये दिसणार नाही. गेल्या अनेक दिवसांपासून पडद्यावरून गायब असलेल्या अनुष्काचे येत्या काही महिन्यांत अनेक मोठे चित्रपट रिलीज होत आहेत. आमिर खानसोबत पीके, रणबीर कपूरसोबत बॉम्बे वेल्वेट आणि रणवीर सिंहसोबत दिल धडकने दो, अशी या चित्रपटांची नावे आहेत.