Join us

कविताने दाखल केला एफआयआर

By admin | Updated: September 23, 2014 06:31 IST

एफआयआर या मालिकेतील अभिनेत्री कविता कौशिक डेबिट कार्ड फ्रॉडला बळी पडली आहे.

एफआयआर या मालिकेतील अभिनेत्री कविता कौशिक डेबिट कार्ड फ्रॉडला बळी पडली आहे. कविता तिच्या मित्रांसोबत थायलँडमध्ये सुटी घालवण्यासाठी गेली होती. तिथेच तिला समजले की तिच्या डेबिट कार्डचे कोणीतरी क्लोन तयार केले असून तिची फसवणूक केली जात आहे. कविता शॉपिंगदरम्यान तिच्या डेबिट कार्डचाच वापर करीत असते. याचदरम्यान कोणीतरी तिच्या डेबिट कार्डचे क्लोन तयार केले आणि तिच्या अकाऊंटमधून जवळपास एक लाखांचे शॉपिंग केले. कविता म्हणाली की, ‘हे खरंच थक्क करणारे आहे.’ अकाऊंटमधून पैसे डेबिट झाल्याचा मॅसेज आल्यावर तिला या फसवणुकीची माहिती मिळाली. कविताने याबाबत पोलिसांत तक्रार दिली आहे. कविताने सांगितले की, ‘मी नेहमीच अशा प्रकरणांपासून सावध असते; पण मला वाटते असे होणारच होते. हा एखाद्या मोठ्या घोटाळ्याचा प्रकार असावा असे वाटतेय. मी पोलिसांत तक्रार दिली आहे; पण सर्वांनीच सावधपणे डेबिट कार्डचा वापर करायला हवा.’