Join us  

अखेर प्रतीक्षा संपली...! 'आदिपुरुष'चा ट्रेलर या तारखेला होणार रिलीज

By ऑनलाइन लोकमत | Published: May 04, 2023 12:10 PM

प्रभास(Prabhas)चा आगामी चित्रपट 'आदिपुरुष' (Adipurush) हा असाच एक चित्रपट आहे ज्याची आतुरतेने वाट पाहिली जात आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत क्रिती सेनन, सनी सिंग आणि सैफ अली खान मुख्य भूमिकेत आहेत.

प्रभास(Prabhas)चा आगामी चित्रपट 'आदिपुरुष' (Adipurush) हा असाच एक चित्रपट आहे ज्याची आतुरतेने वाट पाहिली जात आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत क्रिती सेनन, सनी सिंग आणि सैफ अली खान मुख्य भूमिकेत आहेत. 'आदिपुरुष'चे दिग्दर्शन ओम राऊत यांनी केले आहे. त्यांचा हा चित्रपट रामायणावर आधारित आहे. आत्तापर्यंत 'आदिपुरुष' चित्रपटाशी संबंधित प्रभास (Prabhas), क्रिती सेनॉन (Kriti Sanon) आणि सनी सिंग(Sunny Singh)चे अनेक पोस्टर रिलीज झाले आहेत. ज्यामध्ये तिघेही राम, सीता आणि लक्षच्या लूकमध्ये दिसत होते. आता 'आदिपुरुष' चित्रपटाच्या ट्रेलरबाबत एक मोठे अपडेट समोर आले आहे.

आदिपुरुषचा ट्रेलर कधी रिलीज होणार आहे यासंदर्भात मोठी माहिती समोर आली आहे. पिंकविला या इंग्रजी वेबसाइटच्या वृत्तानुसार, 'आदिपुरुष' चित्रपटाचा ट्रेलर ९ मे रोजी रिलीज होऊ शकतो. वेबसाइटनुसार, चित्रपटाच्या जवळच्या सूत्रांनी सांगितले की ९ मे रोजी संध्याकाळी मुंबईत एक विशेष कार्यक्रम आयोजित केला जाईल आणि प्रदर्शित केला जाईल. 'आदिपुरुष' चित्रपटाचा ट्रेलर जवळपास ३ मिनिटांचा असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, याविषयी चित्रपटाच्या निर्माते आणि कलाकारांकडून कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.

'आदिपुरुष' हा चित्रपट १६ जून रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट गेल्या २ वर्षांपासून चर्चेत आहे. गेल्या वर्षी 'आदिपुरुष' चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला होता. ज्यामध्ये राम आणि रावण म्हणजेच सैफ अली खानच्या लूकवर बराच वाद झाला होता. इतकेच नाही तर काही दर्शकांनी 'आदिपुरुष' चित्रपटाचे VFX देखील अतिशय कमकुवत असल्याचे सांगितले. अशा परिस्थितीत निर्मात्यांनी चित्रपटात काही सुधारणा केल्याचे सांगण्यात येत आहे.

टॅग्स :आदिपुरूषप्रभासक्रिती सनॉनदेवदत्त नागे