Join us
Daily Top 2Weekly Top 5

अखेर दोन वर्षानंतर राखी सावंतच्या पतीचा चेहरा आला समोर, Bigg Boss 15 केली एंट्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2021 14:52 IST

बिग बॉस शोमध्ये स्पर्धक आणि रसिकसुद्धा 'या' व्यक्तीला राखी सावंतचा पती रितेश मानत आहेत.हा स्क्रीनशॉट बिग बॉस १५ फॅनक्लबवर व्हायरल होत आहे.

2019 मध्ये, ड्रामा क्वीन राखी सावंतने सोशल मीडियावर तिच्या लग्नाचे फोटो शेअर करत चाहत्यांना आश्चर्यचकित केले होते. राखी सावंतच्या या लग्नाच्या फोटोंमध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तिच्या पतीचा चेहराच दिसत नव्हता.लग्नसोहळा पार पाडताना रितेशचा हात फक्त एका फोटोत दिसत होता. जेव्हापासून राखीचं रितेशशी लग्न झालं तेव्हापासूनच त्याच्याबद्दल जाणून घेण्याची अनेकांची उत्सुकता आहे.

राखी सावंतचा पती कसा दिसतो किंवा तो कोण आहे याविषयी राखीने कोणतीच माहिती समोर येऊ दिली नव्हती.  रितेश एक एनआरआय असून त्याचा स्वतःचा व्यवसाय आहे. रितेश ब्रिटनमध्ये राहत असल्याच्या चर्चा होत्या.पण लग्नाच्या फोटोंमध्ये समोर आलेल्या फोटोंमध्ये राखी सावंतच्या पतीचा चेहरा न दिल्यामुळे तिच्या लग्नावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते. लोकांनी राखीच्या लग्नाला खोटा आणि ड्रामा म्हटले होते.

2 वर्षांनंतरही अनेक लोक राखीच्या लग्नाला फक्त पब्लिसिटी स्टंट मानतात. पण आता राखीचा पती रितेश जगासमोर आला आहे. राखी सावंतसोबत रितेशनेही बिग बॉसच्या घरात प्रवेश केला आहे. राखी आणि रितेश BB15 मध्ये जाणार असल्याची बातमी समोर आल्यापासून चाहत्यांची उत्सुकता वाढली होती.बिग बॉस शोमधला समोर आलेल्या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती दिसली जो सगळ्यांसाठी अनोळखी चेहरा होता.  

बिग बॉस शोमध्ये स्पर्धक आणि रसिकसुद्धा 'या' व्यक्तीला रितेश मानत आहेत.हा स्क्रीनशॉट बिग बॉस १५ फॅनक्लबवर व्हायरल होत आहे. जो रितेश असल्याचे सांगितले जात आहे. राखी सावंत, देवोलिना भट्टाचार्जी, रश्मी देसाई आगामी एपिसोडमध्ये प्रवेश करणार आहेत.राखीसोबतच तिच्या पतीचीही एन्ट्री प्रोमोमध्ये दाखवण्यात आली आहे. प्रोमोमध्ये राखी हातात पूजेचे ताट घेऊन रितेशचे या घरामध्ये स्वागत करताना दिसली.राखीने आपल्या पतीची आरती केली आणि त्यानंतर त्याच्या पायासुद्धा पडली. आता राखी आणि रितेशच्या एंट्रीने शो अधिक रंजक होणार हे मात्र नक्की. राखी आणि रितेश घरात काय कमाल घडवून आणतात याकडेच सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

टॅग्स :राखी सावंतबिग बॉस