आपल्या मुलींना घेऊन चित्रपट तयार करणाऱ्या दिग्दर्शकांमध्ये सर्वात प्रथम नाव महेश भट्ट यांचे आहे. मुलगी पूजा भट्ट हिला आपल्या दिग्दर्शनात पुढे आणण्यास त्यांना संकोच वाटला नाही. पूजा १७ वर्षांची असताना त्यांनी ‘डॅडी’ या चित्रपटात तिला लाँच केले. त्यानंतर दिल है के मानता नही, सडक, फिर तेरी कहानी याद आई, सर आणि दिग्दर्शक म्हणून त्यांचा शेवटचा चित्रपट जख्ममध्येही पूजाने काम केले. महेश भट्ट यांच्याशिवाय पोटच्या मुलींना घेऊन ज्यांनी दिग्दर्शन केले आहे, अशांची यादी खूपच लहान आहे. यामध्ये दिल, बेटा, राजासारखे चित्रपट तयार करणाऱ्या दिग्दर्शक इंद्रकुमार यांचे नाव येते. त्यांनी आपली मुलगी श्वेता हिला हिमेश रेशमियाची नायिका म्हणून कर्ज चित्रपटात पुढे आणले. सुभाष घई यांच्या कर्जच्या रिमेकमध्ये श्वेताने टीना मुनीमची भूमिका निभावली होती. हा चित्रपट जबरदस्त आपटला. काही कालावधीपूर्वी इंद्रकुमार यांनी ‘सुपर नानी’ या चित्रपटात श्वेताला संधी दिली, मात्र हादेखील चित्रपट अपयशी ठरला. कपूर परिवाराची गोष्ट आणखी वेगळी आहे. दिग्दर्शक असणाऱ्या वडील रणधीर कपूर यांनी आपल्या कोणत्याही मुलीला घेऊन चित्रपट काढण्याची हिंमत दाखविली नाही. कमल हसन यांनीही आपल्या दोन्ही मुली श्रुती आणि अक्षरा यांना घेऊन चित्रपट केले नाहीत व करण्याचा त्यांचा इरादाही दिसत नाही. कमल हसन सातत्याने चित्रपट तयार करतात. बॉलीवूडमधील दिग्गज आधुनिकतेच्या गोष्टी जरूर करतात, मात्र जेव्हा आपल्या मुलींना घेऊन चित्रपट तयार करण्याची वेळ येते, त्या वेळी त्यांच्या प्रयत्नांना मर्यादा पडतात. - ंल्ल४्न.ं’ंल्ल‘ं१@’ङ्म‘ें३.ूङ्मेमोठमोठ्या कलाकारांना घेऊन चित्रपट दिग्दर्शित करणारे जे.पी. दत्ता गेल्या अनेक वर्षांपासून आपली मुलगी निधी हिला अभिनेत्री म्हणून पुढे आणण्याच्या प्रयत्नात आहेत. निधीच्या चित्रपटाचा नायक हा माध्यमांचे आकर्षण बनू शकेल असा नसल्याने याची फारशी माहिती समोर आली नाही. बॉलीवूडची मानसिकता पुरुषप्रधान अधिक आहे. आपल्या मुलांचे पदार्पण जोरात व्हावे म्हणून अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते विशेष प्रयत्न करतात. त्याचवेळी त्यांच्या मुलींच्या बाबतीत असे काही फारसे घडत नाही. दिग्दर्शकांची गोष्ट तर आणखी अवघड. पहिल्यांदा वडील आपल्या मुलीला अभिनेत्री बनविण्यासाठी अधिक सकारात्मक असत नाहीत आणि असले तरी मुलीसाठी चित्रपट तयार करतीलच याची खात्री देता येत नाही. जे. पी. दत्ता यांनी ही हिंमत दाखविली.
दिग्दर्शक पित्याच्या अभिनेत्री कन्या
By admin | Updated: September 10, 2015 04:29 IST