Join us
Daily Top 2Weekly Top 5

वडील गीतकार, मुलगा संगीतकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2015 00:12 IST

मराठी आणि हिंदी चित्रपटांत संगीतकारांच्या जोड्यांची बरीच नावं ठळकपणे डोळ्यांसमोर येतात. वडील आणि मुलगा दोघंही संगीतकार असल्याची

मराठी आणि हिंदी चित्रपटांत संगीतकारांच्या जोड्यांची बरीच नावं ठळकपणे डोळ्यांसमोर येतात. वडील आणि मुलगा दोघंही संगीतकार असल्याची उदाहरणं आहेत. मात्र एखाद्या चित्रपटासाठी वडिलांनी लिहिलेलं गाणं मुलानं संगीतबद्ध केल्याचं उदाहरण अगदीच दुर्मीळ. हा योग केदार शिंदे दिग्दर्शित ‘अगं बाई अरेच्चा २’ या चित्रपटात जुळून आला आहे. गीतकार मनोहर गोलांबरे यांनी गीतलेखन केलं असून, त्याला त्यांचा मुलगा निषाद यानं स्वरसाज चढवला आहे. चित्रपटातील ‘एक पोरगी’ हे गीत मनोहर गोलांबरे यांनी रचले असून, गायलेसुद्धा त्यांनीच आहे. तसेच ‘माझा देव कुणी पाहिला?’ हे गीत ओम्कार दत्त लिखित असून, गोलांबरे यांनी गायले आहे. ही गाणी निषादने संगीतबद्ध केली आहेत. ‘हा आमच्या आयुष्यातील अत्यंत भाग्याचा योग आहे. हे माझ्या आईचे स्वप्न होते की, मी आणि बाबा एकाच मंचावर असावे. ते या चित्रपटाच्या निमित्ताने पूर्ण झाले आहे,’ असे मत निषादने व्यक्त केले. ‘अगं बाई अरेच्चा २’ हा चित्रपट २२ मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.