मुंबई- लेखक भा.रा भागवत यांच्या कादंबरीतील नायक ‘फास्टर फेणे’ याने सर्वांनाच वेड लावले होते. आता सर्वांच्या लाडक्या ‘फास्टर फेणे’वर सिनेमा तयार केला जातोय. विशेष म्हणजे या चित्रपटाची निर्मिती रितेश देशमुख करतोय. ‘लय भारी’ या चित्रपटानंतर तो मराठी चित्रपटांत रमेल असे सर्वांनाच वाटले होते. पण, रितेश पुन्हा हिंदी सिनेमात बिझी झाला. आता तो पुन्हा एकदा मराठी सिनेमांकडे वळलाय. येत्या 10 आॅक्टोबरला तो या सिनेमाची अधिकृतपणे घोषणाही करणार आहे. आदित्य सरपोतदार सिनेमाचे दिग्दर्शन करणार असून क्षितीज पटवर्धन या चित्रपटाच्या पटकथेवर काम करत असल्याची माहिती मिळतेय.
‘फास्टर फेणे’ येणार रूपेरी पडद्यावर
By admin | Updated: October 3, 2016 02:29 IST