Join us  

गोव्यात फरहान अख्तरला गर्लफ्रेंडने दिला होता डच्चू, 'या' चित्रपटात दाखवली होती आपल्या ब्रेकअपची स्टोरी!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2024 12:21 PM

गायक, अभिनेता, निर्माता आणि दिग्दर्शक असा मल्टिटॅलेंटेंड असलेली व्यक्ती म्हणजे फरहान अख्तर.

गायक, अभिनेता, निर्माता आणि दिग्दर्शक असा मल्टिटॅलेंटेंड असलेली व्यक्ती म्हणजे फरहान अख्तर. फरहान हा गीतकार जावेद अख्तर आणि त्यांची पहिली पत्नी हनी ईराणी यांचा मुलगा आहे. पण, जावेद अख्तर यांचा मुलगा अशी ओळख न ठेवता त्यानं स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली. 2001 मध्ये त्यानं आमिर खान सैफ अली खान यांच्या दिल चाहता सिनेमातून दिग्दर्शक म्हणून पदार्पण केलं. 'दिल चाहता है' हा फरहान अख्तरच्या करिअरमधील सर्वोत्तम चित्रपटांपैकी एक मानला जातो. पण तुम्हाला माहित आहे का की या चित्रपटातील सैफ अली खानचा ब्रेकअप सीन फरहान अख्तरच्या वैयक्तिक आयुष्यापासून प्रेरित होता. 

फरहान अख्तर सध्या  'मडगाव एक्सप्रेस' या चित्रपटाचे प्रमोशन करत आहे. यावेळी 'इंडिया टुडे'ला दिलेल्या मुलाखतीत त्याने 'दिल चाहता है'मध्ये वापरलेल्या ब्रेकअप स्टोरीची गोष्ट सांगितली. फरहान अख्तर म्हणाला, 'माझा सर्वात भयानक अनुभव गोव्याच्या प्रवासादरम्यानचा होता. त्यावेळी मी ज्या मुलीला डेट करत होतो. ती मला गोव्यात सोडून गेली. मला एकट्यानेच परतावं लागलं होतं.  तो अत्यंत दुःखद क्षण होता'. हीच स्टोरी आम्ही 'दिल चाहता है' वापरली होती. 'दिल चाहता है' मधील सैफच्या पात्राची प्रेरणा फरहानच्या या कथेतून घेण्यात आली होती. 'दिल चाहता है'मध्ये सुचित्रा पिल्लईने सैफ अली खानच्या मैत्रिणीची भूमिका साकारली होती. 

फरहान अख्तरने नंतर हेअर स्टायलिस्ट असलेल्या अधुना अख्तरशी लग्न केलं होतं. त्याला दोन मुलीही आहेत. पण तब्बल १७ वर्षांनी त्यांचा घटस्फोट झाला. यानंतर फरहान अख्तरने 2022 मध्ये गायिका शिबानी दांडेकरसोबत लग्न केलं. वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाल्यास,  फरहान अख्तर सध्या त्याच्या 'डॉन 3' या नवीन चित्रपटामुळे चर्चेत आहे, ज्यामध्ये रणवीर सिंग मुख्य भूमिकेत दिसणार आहे. कियारा अडवाणीही यात असेल. 'डॉन ३' दिग्दर्शित करण्यासोबतच फरहान अख्तर एका चित्रपटातही काम करताना दिसणार आहे, ज्याचे शूटिंग जुलैमध्ये सुरू होणार आहे. 

टॅग्स :फरहान अख्तरबॉलिवूडसेलिब्रिटीसैफ अली खान