Join us  

Big Boss 16 : खान भावंडांना अश्रू अनावर, फराह खानचा बिग बॉसच्या घरात प्रवेश; 'शिव' लाही मारली मिठी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 09, 2023 11:37 AM

बिग बॉसमध्ये सध्या फॅमिली विक सुरु आहे. साजिद खानची बहिण आणि प्रसिद्ध नृत्य दिग्दर्शिका फराह खान हिने घरात प्रवेश केला असून साजिदची भेट घेताना दोघा बहिण भावांना अश्रू अनावर झालेत. 

Big Boss 16 :  बिग बॉस हिंदी च्या १६ व्या पर्वात सध्या अनेक घडामोडी घडत आहेत. भांडणं, प्रेमप्रकरणं आणि सलमान खानची शाळा यामुळे हे पर्व चर्चेत आहे. या पर्वात सहभागी असलेला प्रसिद्ध दिग्दर्शक साजिद खान (Sajid Khan) त्याच्यावरील आरोपांमुळे कायमच चर्चेत आहे.  दरम्यान बिग बॉसमध्ये सध्या फॅमिली विक सुरु आहे. साजिद खानची बहिण आणि प्रसिद्ध नृत्य दिग्दर्शिका फराह खान (Farah Khan) हिने घरात प्रवेश केला असून साजिदची भेट घेताना दोघा बहिण भावांना अश्रू अनावर झालेत. 

कलर्सने पोस्ट केलल्या नवीन प्रोमो मध्ये फॅमिली विकचे व्हिडिओ समोर येत आहेत. त्यातच आता नवीन व्हिडिओ मध्ये फराह खानने घरात प्रवेश केला आहे. तिचा घरात प्रवेश होताच सर्व सदस्यांना एका जागीच थांबायला सांगितले जाते. यानंतर फराह खान रडत रडतच मागून साजिद खानला मिठी मारते.ती म्हणते, 'आईला तुझा खूप अभिमान वाटतो. तू खरंच खूप भाग्यवान आहेस की तुला घरात अशी मंडली मिळाली आहेत.'

शिवलाही पाहून फराह भावूक

मराठमोळा शिव ठाकरेही (Shiv Thackeray) सध्या हिंदी बिग बॉस गाजवतोय. त्याच्या खेळावर तर प्रेक्षक फिदा आहेत. सलमान खानही त्याचे भरभरुन कौतुक करताना दिसतो. फराह खाननेही घरात येताच शिव ला मिठी मारली. यावेळी दोघेही भावूक झाले होते. घरातील सर्वच सदस्यांचा अश्रुंचा बांध फुटला. 

बिग बॉस हिंदी सध्या रंजक वळणावर आहे. मागील  आठवड्यात एलिमिनेशन झाले नाही. आता घरातील सदस्यांचे कुटुंबीय त्यांना भेटायला येणार असल्यामुळे हा आठवडा सदस्यांना भावूक करणारा असणार आहे. 
टॅग्स :बिग बॉसफराह खानसाजिद खानशीव ठाकरेसलमान खानकलर्स