Join us  

"फक्त उर भरून येतो.."; फॅन्सचं खास सरप्राइज पाहून समीर चौगुले भावुक

By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2024 1:18 PM

फॅनच्या मित्रांनी दिलेलं खास सरप्राइज पाहून समीर चौगुले भावुक. फॅन्सनी काय केलं बघा..

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' हा टेलिव्हिजनवरील लोकप्रिय शो. केवळ भारतात नव्हे तर जगभरात 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' चे चाहते आहेत. हास्यजत्रातील अनेक कलाकारांना त्यांचे फॅन्स भरभरुन प्रेम करत असतात. नुकताच समीर चौगुलेंना त्यांच्या फॅन्सचा हा भन्नाट अनुभव आला. समीर यांनी सोशल मीडियावर फोटो शेअर करत सर्वांना ही खास गोष्ट सांगितली.

समीर चौगुलेंनी सोशल मीडियावर एक फोटो शेअर केलाय. या फोटोत एक माणूस वगळता सर्वांनी समीर यांचे मास्क चेहऱ्यावर लावले आहेत. हा फोटो पोस्ट करुन समीर लिहीतात, "असे प्रेम करणारे Fans हीच माझी कमाई... माझ्या एका चाहत्याचा दीप डाबरे याचा काल वाढदिवस होता.. त्याच्या मित्र मैत्रिणींनी माझ्या चेहेऱ्याचा मास्क घालून त्याला सरप्राइज दिलं...अश्या वेळी काय बोलावं कळत नाही हो...फक्त उर भरून येतो..... दीप ....happy birthday my dear...thank you for loving me so much.....lots of love to all of you...खूप प्रेम तुम्हा सर्वांना....thank you वनराई for letting me know this...."

समीर यांना मिळणारं चाहत्यांचं हे प्रेम पाहताच मराठी मनोरंजन विश्वातील अनेक कलाकारांनी त्यांचं कौतुक केलंय. समीर आणि 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' ची संपूर्ण टीम सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर गेली आहे. समीर सर्वांसोबत ऑस्ट्रेलियातले खास रील शूट करत आहेत. 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' मध्ये समीर साकारत असलेल्या विविध विनोदी भूमिकांना प्रेक्षकांचं प्रेम मिळतंय.

टॅग्स :समीर चौगुलेमहाराष्ट्राची हास्य जत्रा