Join us

नायशा खन्ना टायगरची फॅन

By admin | Updated: July 25, 2015 02:40 IST

सगळीकडे ‘बजरंगी भाईजान’मधील हर्षाली मल्होत्राचे कौतुक सुरू असताना नायशा खन्नाही बॉलीवूडच्या प्रकाशझोतात येऊ पाहत आहे. नायशा खन्नाला

सगळीकडे ‘बजरंगी भाईजान’मधील हर्षाली मल्होत्राचे कौतुक सुरू असताना नायशा खन्नाही बॉलीवूडच्या प्रकाशझोतात येऊ पाहत आहे. नायशा खन्नाला ‘ब्रदर्स’ या चित्रपटात अक्षयकुमार आणि जॅकलिन फर्नांडिस यांची मुलगी म्हणून घेण्यात आले आहे. नायशा ही टायगर श्रॉफची प्रचंड फॅन आहे. तिने टायगर श्रॉफचा ‘हीरोपंती’ चित्रपट अनेक वेळा पाहिलेला आहे. तिने आतापर्यंत अनेक जाहिरातींमध्ये काम केले असून, तिला खरं तर शिक्षिका व्हायचे आहे. तिने एकदा सलमानला विचारले की, तो एवढा सुंदर का आहे? तर त्याने तिला उत्तर दिले की, ‘तो एवढा सुंदर आहे म्हणून तर ही सुंदर मुलगी त्याला आलिंगन देऊ शकते.’ नायशाने शूटिंग दरम्यान तिच्या खट्याळपणामुळे सर्वांचे मन जिंकून घेतले.