Join us

मनसेच्या धमकीनंतर फवाद खानची भारतातून 'कलटी'?

By admin | Updated: September 27, 2016 12:03 IST

उरी हल्ल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पाकिस्तानी कलाकारांना 48 तासात भारत सोडून जाण्याची धमकी दिली होती. मनसेच्या धमकीनंतर पाकिस्तानी अभिनेता फवाद खान

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि.27- उरी हल्ल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पाकिस्तानी कलाकारांना 48 तासात भारत सोडून जाण्याची धमकी दिली होती. मनसेच्या धमकीनंतर पाकिस्तानी अभिनेता फवाद खान याने भारत सोडल्याचं वृत्त आहे.
 
हिंदुस्तान टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार,पाकिस्तानी अभिनेता फवाद खान याने गुपचुपरित्या भारतातून पळ काढला आहे. दिग्दर्शक करण जोहरचा प्रसिद्ध टॉक शो 'कॉफी विथ करण'चं पाचवं सत्र लवकरच सुरू होणार आहे. 'कॉफी विथ करण'च्या पहिल्या शोमध्ये  फवाद खान गेस्ट म्हणून येणार होता. मात्र,आता मनसेच्या धमकीनंतर फवादच्या जागी शाहरूख खान आणि आलिया भट्ट येणार आहेत. करण जोहरचा आगामी चित्रपट ‘ऐ दिल है मुश्कील’ चित्रपटातही फवाद खान खास भूमिकेत आहे. 
 
पाकिस्तानी कलावंतानी 48 तासांच्या आत मायदेशी परत जावं अन्यथा जिथे काम करत असाल तिथे घुसून मारू अशी धमकी मनसेने दिली होती.