Join us

अक्षयसारखा पती असतानाही माझ्यासोबत झालं होतं हे प्रकरण - ट्विंकल

By admin | Updated: March 24, 2017 21:03 IST

अभिनेत्री ट्विंकल खान्नाने एका वृत्तापत्रात लिलहलेल्या लेखात धक्कादायक खुलासा केला आहे

 ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. 24 - अभिनेत्री ट्विंकल खान्नाने एका वृत्तापत्रात लिलहलेल्या लेखात तिच्यासोबत झालेल्या प्रकरणाचा खुलासा केला आहे. अक्षय कुमार सारखा पती असूनही माझ्या मोबईलवर अश्लिल मेसेज आले होते. काही वर्षांपूर्वी माझ्या मोबाइलवर एक मेसेज आला होता. तो वाचून मी खूप घाबरले होते. एका श्रीमंत क्लायंटने मला एक अश्लिल मेसेज पाठवला होता. मला माझे काम प्रोफेशनल पद्धतीने पूर्ण करायचे होते आणि मी तसेच केले.मी एक स्पष्टवक्ती महिला आहे. माझे लग्न अशा एका व्यक्तीसोबत झाले आहे, जो चित्रपटांमध्ये मारधाड करतो. तरीसुद्धा मी अशा छळाला बळी पडले. मग त्या महिलांची काय अवस्था असेल, ज्यांना कामानिमित्त घराबाहेर राहावे लागते. नॅशनल बार असोसिएशननुसार, देशातील 38 टक्के महिला कामाच्या ठिकाणी लैंगिक छळाला बळी पडतात. अशी खंत आपल्या लेखात ट्विंकलने व्यक्त केली आहे. कामाच्या ठिकाणी महिलांवर होणाऱ्या लैगिंग छळाविषयी या लेखात ट्विंकल खान्नाने खंत व्यक्त केली आहे. यामध्ये ती म्हणते, महिलेला बेडरुममध्ये सेक्सी बोलणे योग्य असले तरी सार्वजनिक ठिकाणी तिला सेक्सी संबोधणे पूर्णपणे चुकीचे आहे. महिलेचा आदर हा केलाच गेला पाहिजे. त्यांच्या कौशल्याचे कौतुक केले गेले पाहिले. ट्विंकलच्या या लेखाचे स्वतः अक्षयने कौतुक केले आहेलवकरच ट्विंकलची पहिली निर्मिती असलेला पॅडमॅन हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. अक्षय कुमार, सोनम कपूर आणि राधिका आपटे यांची मुख्य भूमिका असलेला हा सिनेमा एक चरित्रपट आहे.