मराठी चित्रपट जगला पाहिजे, टिकला पाहिजे असे अनेक निर्माते वारंवार सांगत असतात. मात्र याच निर्मात्यांना मराठी भाषेचे वावडे आहे असे वाटायला लागले आहे. उदाहरण द्यायचे झाले तर काल प्रदर्शित झालेल्या ‘कॉफी आणि बरेच काही’ चित्रपटाचे देता येईल. निर्माता - दिग्दर्शक प्रकाश कुंटेंच्या या चित्रपटाचे नाव इंग्रजीत आहे; तसेच चित्रपटाचे प्रसिद्धिपत्रकही इंग्रजीतच आहे. इंग्रजीच्या या पत्रकात कलाकार, तंत्रज्ञ यांची नावेही इंग्रजीतच आहेत. एकूणच ही कॉफी जरी मराठी असली तरी त्याची चव मात्र अस्सल इंग्रजी आहे.
मराठी कॉफीला इंग्रजी चव
By admin | Updated: April 4, 2015 03:59 IST