दिग्दर्शक मिलिंद कवडे यांच्या ‘वन टू थ्री फोर’ या चित्रपटाला प्रदर्शित होण्यासाठी अखेर मुहूर्त मिळाला. या चित्रपटाची शूटिंग एक ते दीड वर्षापूर्वीच संपली होती. परंतु शेवटी बऱ्याच प्रतीक्षेनंतर हा चित्रपट २७ मे रोजी प्रदर्शित होणार आहे. नुकतेच या चित्रपटाने कल्याण इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये दोन पुरस्कारांवर बाजी मारली आहे. सर्वोत्कृष्ट छायाचित्रणासाठी सॅटिनिओ यांना, तर सर्वोत्कृष्ट संगीतासाठी अमितराज यांना गौरविण्यात आले. वन टू थ्री फोर हा सस्पेन्स चित्रपट आहे. या चित्रपटात संजय नार्वेकर, भूषण प्रधान, प्रिया मराठे, अंशुमन विचारे, विशाखा सुभेदार, अनिकेत केळकर, तेजा देवकर, विजया मौर्या, संजय मोने, किशोर चौघुले, अभिजित चव्हाण या कलाकारांचा समावेश आहे.
मुहूर्त मिळाला अखेर चित्रपटाला
By admin | Updated: February 26, 2016 03:42 IST