Join us

इमरानने दूर केली आलियाची नाराजी

By admin | Updated: October 3, 2014 23:57 IST

इमरान हाश्मीने त्याची मामेबहीण असलेल्या आलिया भट्टचा एकही चित्रपट पाहिला नसल्याने ती त्याच्यावर नाराज होती; पण आता इमरानने आलियाची नाराजी दूर केली आहे.

इमरान हाश्मीने त्याची मामेबहीण असलेल्या आलिया भट्टचा एकही चित्रपट पाहिला नसल्याने ती त्याच्यावर नाराज होती; पण आता इमरानने आलियाची नाराजी दूर केली आहे. आलियाचा स्टुडंट ऑफ द ईअर हा चित्रपट त्याने पाहिला आहे. याबाबत इमरान सांगतो. ‘ती माङयावर नाराज होती, कारण मी तिचा स्टुडंट ऑफ द ईअर हा चित्रपट पाहिला नव्हता. त्यामुळे मी तो चित्रपट डीव्हीडीवर पाहिला. त्यानंतर मी तिला कॉल करून याबाबत सांगितले. सिद्धार्थ मल्होत्र आणि वरुण धवनलाही मी त्यांच्या कामाबाबत शुभेच्छा दिल्या आहेत. आलिया चित्रपटात खूपच छान दिसत आहे. आता तर तिचे अनेक चित्रपट आले आहेत. हायवे चित्रपटात तिची भूमिकाही दमदार आहे. तिचा त्यातील अभिनयही त्याच दमाचा आहे.’ इमरानचा राजा नटवरलाल हा चित्रपट नुकताच रिलीज झाला असून, तो बॉक्स ऑफिसवर फारशी कमाल दाखवू शकला नाही. आता त्याचा उंगली हा चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज आहे.