Join us  

नेपोटिझमवर भाष्य करणारी इमरान हाश्मीची नवीन वेबसीरिज 'शोटाइम', टीझर रिलीज

By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2023 5:14 PM

Show Time Web Series : करण जोहर आता 'शोटाईम' नावाची नवी वेब सीरिज घेऊन येत आहे. त्यात इमरान हाश्मी दिसणार आहे.

जेव्हा-जेव्हा घराणेशाहीची चर्चा होते, तेव्हा चित्रपट निर्माता करण जोहर (Karan Johar) नेहमीच निशाण्यावर येत असतो. बॉलिवूडची क्वीन कंगना राणौत(Kangana Ranaut)ने तर करण जोहरवर सिनेसृष्टीत घराणेशाहीला प्रोत्साहन दिल्याचा आरोप केला होता. आता करण जोहरने याच विषयावर एक सीरिज बनवली आहे. होय, करण जोहर आता 'शोटाईम' (Show Time) नावाची नवी वेब सीरिज घेऊन येत आहे. त्यात इमरान हाश्मी दिसणार आहे, ज्याने अलीकडेच 'टायगर ३'मध्ये आपल्या अभिनयाने सर्वांना चकित केले आहे. करण जोहरच्या नवीन वेब सीरिज 'शोटाईम'चा टीझरही रिलीज झाला आहे.

शोटाइमची निर्मिती करण जोहर त्याच्या प्रोडक्शन धर्मा एंटरटेनमेंटच्या बॅनरखाली करत आहे. हे ओटीटी प्लॅटफॉर्म डिस्ने प्लस हॉटस्टारवर स्ट्रीम केले जाईल. करण जोहरचा चॅट शो 'कॉफी विथ करण ८' सध्या या प्लॅटफॉर्मवर स्ट्रीम होत आहे. इमरान हाश्मीशिवाय नसीरुद्दीन शाह, मौनी रॉय, विजय राज, राजीव खंडेलवाल, महिमा मकवाना, केके मेनन आणि श्रिया सरन यांच्यासह अनेक स्टार्स 'शोटाइम'मध्ये दिसणार आहेत. वेब सीरिजमध्ये प्रत्येकाची झलक पाहायला मिळते.

काय असणार 'शोटाइम'मध्ये? सिनेइंडस्ट्रीतील काळी बाजू आणि त्यातील आतली रहस्ये 'शोटाईम' वेब सिरीजच्या माध्यमातून समोर येणार आहेत. लाइट्स, कॅमेरा अँड अॅक्शनवर आधारित जगात प्रत्येकजण पॉवरसाठी आपली मर्यादा कशी ओलांडतो हे दर्शवेल. एकीकडे टीझरमध्ये शोबिझच्या झगमगाट जगाची झलक आहे, तर दुसरीकडे घराणेशाहीचा मुद्दाही आहे. टीझरमध्ये एका ठिकाणी इमरान हाश्मीही म्हणतो आहे की, 'घराणेशाहीच्या मुखवट्याच्या मागे, प्रत्येक बाहेरील व्यक्तीला आंतरिक बनायचे आहे.'

या दिवशी येणार भेटीला'शोटाईम' वेब सीरिजच्या लॉन्चची तारीख अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही, फक्त ती २०२३ मध्ये स्ट्रीम होणार आहे. यामध्ये इमरान हाश्मीने बॉलिवूडच्या बादशाहाची भूमिका साकारली आहे. मौनी रॉय अभिनेत्री आणि डान्सरच्या भूमिकेत आहे आणि नसीरुद्दीन शाह मास्टरमाईंड बनले आहेत.

टॅग्स :इमरान हाश्मीकरण जोहरनसिरुद्दीन शाहमौनी राॅय