Join us

बेला शेंडेच्या आवाजाने 'शाली'चा मुहूर्त

By admin | Updated: November 3, 2014 01:47 IST

दिग्दर्शक अतुल साटम यांच्या 'शाली' या सिनेमात रसिकांना दमदार कथानाकासोबतच कोकणातील नयनरम्य वातावरण, चालीरीती, परंपरा, लोककला यांचे दर्शन घडणार आहे

दिग्दर्शक अतुल साटम यांच्या 'शाली' या सिनेमात रसिकांना दमदार कथानाकासोबतच कोकणातील नयनरम्य वातावरण, चालीरीती, परंपरा, लोककला यांचे दर्शन घडणार आहे. तसेच फणसाप्रमाणे वरून काटेरी पण आतून रसाळ अशा कोकणी व्यक्तिरेखांचे दर्शनही घडणार आहे. बेला शेंडे हिच्या गीत रेकॉडिंगने या चित्रपटाचा मुहूर्त झाला. गीतकार गुरु ठाकूर यांनी शब्दबद्ध केलेल्या आणि विजय नारायण गवंडे यांनी गीताला संगीत दिले आहे. कै. शंकर पाटील यांच्या 'शारी' या कथेने प्रेरित होऊन मधु मंगेश कर्णिक हे 'शाली'चे संवाद लेखन करीत आहेत. या सिनेमाचे कथानक एका तरुण मुलीभोवती गुंफण्यात आले आहे. पंचविशीतल्या एका सुशील, शालीन, बुद्धिवान तसेच कर्तव्यनिष्ठ तरुणीचे भावविश्व या सिनेमात रसिकांना जवळून पाहता येईल.