Join us  

Ek Villain Returns Box Office Collection: मल्टीस्टारर 'एक व्हिलन रिटर्न्स'नं केली निराशा, ५ दिवसात डब्बा गुल

By ऑनलाइन लोकमत | Published: August 03, 2022 2:09 PM

Ek Villain Returns : तगडी स्टारकास्ट असूनही सिनेमा बॉक्स ऑफिसवर आपली जादू दाखवू शकला नाही. रिलीज होईन पाच दिवसांत या सिनेमाने आपला गाशा गुंडाळला आहे.

Ek Villain Returns Box Office Collection Day 5: मोहित सूरीच्या दिग्दर्शनाखाली बनलेला एक व्हिलन रिटर्न्स  (Ek Villain Returns) आता बॉक्स ऑफिसवर काही खास दाखवण्यात यशस्वी ठरू शकलेला नाही. मोठी स्टारकास्ट असूनही हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरू शकलेला नाही.  मोठी स्टारकास्ट असूनही हा चित्रपट तग धरु शकला नाही. एक व्हिलन रिटर्न्समध्ये जॉन अब्राहम(John Abraham), अर्जुन कपूर(Arjun kapoor), तारा सुतारिया (Tara Sutaria) आणि दिशा पटानी(Disha Patani)  यांच्या प्रमुख भूमिका आहेत. एक व्हिलन रिटर्न्स २९ जुलै रोजी थिएटरमध्ये रिलीज झाला. एक व्हिलन रिटर्न्सचे पाचव्या दिवसाचे कलेक्शन आले आहे.

'एक व्हिलन रिटर्न्स'ला ५० कोटींच्या क्लबमध्ये  प्रवेश करणंही कठीण झालं आहे. या चित्रपटाने चार दिवसांत केवळ 26.56 कोटींचा व्यवसाय केला आहे. आता पाचव्या दिवशी सिनेमाने फार काही बिझनेस केला नाही. 

एकूण बिझनेस इंडिया टुडेच्या रिपोर्टनुसार, एक व्हिलन रिटर्न्सने पाचव्या दिवशी जवळपास 2.70 कोटींचा गल्ला जमावला आहे. जो अपेक्षेपेक्षा खूपच कमी आहे. या चित्रपटाने पहिल्या दिवशी 7.05 कोटी, दुसऱ्या दिवशी 7.47 कोटी, तिसऱ्या दिवशी 9.02 कोटी आणि चौथ्या दिवशी 3.02 कोटींचा व्यवसाय केला. पाचव्या दिवसाचे कलेक्शन एकत्र केले तर एकूण 29 कोटींच्या आसपास असेल.

'एक व्हिलन रिटर्न्स' हा 2014 मध्ये आलेल्या 'एक व्हिलन' चित्रपटाचा सिक्वेल आहे. या चित्रपटात सिद्धार्थ मल्होत्रा, श्रद्धा कपूर आणि रितेश देशमुख मुख्य भूमिकेत दिसले होते. या चित्रपटात एक नायक आणि एक खलनायक दाखवण्यात आला होता, तर त्याच्या सिक्वेलमध्ये फक्त चार स्टार्स खलनायकाच्या भूमिकेत दिसले आहेत. तरीही हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरू शकलेला नाही. 

टॅग्स :अर्जुन कपूरदिशा पाटनीजॉन अब्राहमतारा सुतारिया