Join us

एक सहज-सुंदर कथा

By admin | Updated: March 11, 2017 02:25 IST

बद्रीनाथ की दुल्हनिया हा चित्रपट आज शुक्रवारी चित्रपटगृहांत प्रदर्शित झाला. हा चित्रपट ‘हम्प्टी शर्मा की दुल्हनिया’चा सीक्वल आहे. या चित्रपटाची गाणी आधीच तरुणाईच्या ओठांवर आहेत.

- जान्हवी सामंतहिंदी चित्रपट - बद्रीनाथ की दुल्हनियाबद्रीनाथ की दुल्हनिया हा चित्रपट आज शुक्रवारी चित्रपटगृहांत प्रदर्शित झाला. हा चित्रपट ‘हम्प्टी शर्मा की दुल्हनिया’चा सीक्वल आहे. या चित्रपटाची गाणी आधीच तरुणाईच्या ओठांवर आहेत. चित्रपटाचा ट्रेलरही लोकांच्या पसंतीस उतरला आहे. हा चित्रपट बद्रीनाथ उर्फ बद्री (वरुण धवन) आणि वैदेही (आलिया भट्ट) यांची कथा आहे. अनेकदा साधेपणा आणि प्रामाणिकपणाच अधिक भावतो. ‘बद्रीनाथ की दुल्हनिया’बद्दलही हेच म्हटले पाहिजे. कधी विनोद तर कधी उपदेश अशा पद्धतीने विवाह संस्था आणि महिलांबद्दल असलेल्या चुकीच्या धारणांची जळमटे दूर सारण्यात हा चित्रपट कमालीचा यशस्वी ठरला आहे. झांशीला राहणाऱ्या बद्रीनाथचा कोटा येथे राहणाऱ्या वैदेहीवर जीव जडतो. वैदेही एक शिकलेली आणि महत्त्वाकांक्षी मुलगी असते. दोघांचेही स्वभाव, विचार, स्वप्नं सगळेच भिन्न आहे. तरीही बद्री आणि वैदेही एकत्र येतात. बद्री एका पितृसत्ताक आणि काहीशा लोभी कुटुंबातला असतो. मुलांच्या लग्नात भरभक्कम हुंडा घेण्याचे या कुटुंबाचे मनसुबे असतात. याउलट वैदेही ही एका मध्यमवर्गीय कुटुंबातील असते. वैदेहीला करिअर करण्यात रस असतो तर तिच्या कुटुंबाला तिचे लग्न उरकण्याची घाई असते. वैमानिकी कॉलेजात प्रवेश घेणाऱ्या वैदेहीला स्वप्नांचे उंच आकाश खुणावत असते. याउलट बद्री हा त्याच्या वडिलांनी बनवलेल्या चौकटीत अगदी फिट बसलेला असतो. वैदेहीच्या आशा-आकांक्षा, महत्त्वाकांक्षा त्याच्या आकलनापलीकडच्या असतात. याच अंगाने सरकणारी कथा मध्यंतरानंतर एका अनोख्या वळणावर पोहोचते. या वळणावर स्वप्न किंवा हुंडा मागणारे कुटुंब यापैकी एकाची निवड वैदेहीला करायची असते.हलके-फुलके विनोद आणि उत्साहवर्धक सीन्समुळे चित्रपटाचा पहिला हाफ खिळवून ठेवतो. बद्रीच्या इच्छा-आकांक्षा, त्याचे विचार आणि आजूबाजूच्या समाजाबद्दलच्या त्याच्या धारणा याभोवती चित्रपटाचा पूर्वार्ध फिरतो आणि उत्तरार्धात चित्रपटाची कथा आपल्याला नकळत एका वैचारिक वळणावर नेऊन पोहोचवते. वैदेहीच्या स्वप्नांना जवळ करण्याचा बद्रीचा निर्णय, या निर्णयानंतर त्याच्या मार्गात येणारी आव्हाने आणि आजूबाजूच्या महिलांकडे पाहण्याचा त्याचा बदललेला दृष्टिकोन या भागात दिसतो. बद्री व वैदेही यांचे नातेही अधिक प्रगल्भ झालेले दिसते. बद्रीला वैदेहीच्या स्वप्नांचा अर्थ कळलेला असतो; पण तरीही आपल्या वडिलांना स्वत:ची मते पटवून देण्यात तो असमर्थ ठरतो. वरुण आणि आलिया या दोघांनीही या चित्रपटात उत्तम काम केलेय. त्यांचा रोमान्स, त्यांची आॅनस्क्रीन केमिस्ट्री अप्रतिम आहे. कथेसोबत वाट्याला येणारी वेदना आणि कोंडी असे सगळेच भाव त्यांनी अगदी हुबेहूब साकारले आहेत. पडद्यावरचा दोघांचाही वावर इतका सहज आणि सुंदर आहे की कुणीही त्यांच्या व्यक्तिरेखांशी एकरूप व्हावे. अलीकडच्या चित्रपटात असा सहज-सुंदर अभिनय दुर्लभ झाला आहे. त्यामुळे वरुण व आलियाचे यासाठी खास कौतुक करावे लागेल. बद्रीचा भाऊ आणि त्याची बहीण (श्वेता प्रसाद), बद्रीचा जिवलग मित्र यांच्या व्यक्तिरेखाही मस्त जमल्या आहेत.चित्रपटाचा उत्तरार्ध अधिक लांबला असला, उपदेशाचे अतिडोस पाजणारा असला तरी निखळ मनोरंजन करण्यात हा चित्रपट कुठेही चुकत नाही. निखळ मनोरंजन हवे असेल तर हा चित्रपट तुम्ही पाहायलाच हवा.हलकेफुलके विनोद आणि उत्साहवर्धक सीन्समुळे चित्रपटाचा पहिला हाफ खिळवून ठेवतो. बद्रीच्या इच्छा-आकांक्षा, त्याचे विचार आणि आजूबाजूच्या समाजाबद्दलच्या त्याच्या धारणा याभोवती चित्रपटाचा पूर्वार्ध फिरतो आणि उत्तरार्धात चित्रपटाची कथा आपल्याला नकळत एका वैचारिक वळणावर नेऊन पोहोचवते.