Join us
Daily Top 2Weekly Top 5

सलमानच्या बर्थडेबाबत प्रश्न विचारणाऱ्याला किंग खानचं चोख उत्तर, म्हणाला, "मी सोशल मीडियावर..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2023 18:36 IST

शाहरुख ट्विटरवर चाहत्यांबरोबर ask srk सेशन घेत असतो. नुकतंच त्याने 'डंकी' निमित्त हे सेशन घेत चाहत्यांच्या प्रश्नांना उत्तरं दिली.

बॉलिवूडचा किंग शाहरुख खान त्याच्या 'डंकी' सिनेमामुळे चर्चेत आहे. २१ डिसेंबरला शाहरुखचा 'डंकी' सिनेमा प्रदर्शित झाला. या सिनेमाचं जोरदार प्रमोशन करण्यात आलं होतं शाहरुख ट्विटरवर चाहत्यांबरोबर ask srk सेशन घेत असतो. नुकतंच त्याने 'डंकी' निमित्त हे सेशन घेत चाहत्यांच्या प्रश्नांना उत्तरं दिली. या सेशनमध्ये शाहरुखला चाहत्याने सलमानबाबत प्रश्न विचारला. 

भाईजान सलमान खानचा आज वाढदिवस आहे. याबाबत एका चाहत्याने शाहरुखला प्रश्न विचारला. चाहत्याने सलमानचा एक फोटो शेअर करत "आज सलमान खानचा वाढदिवस आहे", असं ट्वीट केलं होतं. त्यावर शाहरुखने त्याच्या खास शैलीत चाहत्याला उत्तर दिलं आहे. "मला माहीत आहे आणि मी त्या वाढदिवसाच्या शुभेच्छाही दिल्या आहेत. मी हे सोशल मीडियावर करत नाही कारण, या वैयक्तिक गोष्टी आहेत. तसं भाईचा हा फोटो मस्त आहे," असं उत्तर शाहरुखने दिलं. 

दरम्यान, शाहरुखच्या 'डंकी' सिनेमाला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. या सिनेमात शाहरुखने हार्डी हे पात्र साकारलं आहे. राजकुमार हिराणींचं दिग्दर्शन असलेल्या या सिनेमात शाहरुखबरोबर विकी कौशल, तापसी पन्नू, बोमन इराणी यांच्या मुख्य भूमिका आहेत.

टॅग्स :शाहरुख खानसलमान खानडंकी' चित्रपट