Join us
Daily Top 2Weekly Top 5

शाहरुखच्या 'डंकी'ने रितेशला लावलं 'वेड'; तिकिटांची ॲडव्हान्स बुकिंग करत म्हणाला...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2023 16:59 IST

शाहरुखच्या 'डंकी'साठी चाहते उत्सुक आहेत. चाहत्यांबरोबरच मराठमोळा अभिनेता रितेश देशमुखही 'डंकी' सिनेमाची आतुरतेने वाट पाहत आहे. 

बॉलिवूडचा किंग शाहरुख खान त्याच्या आगामी डंकी या सिनेमामुळे चर्चेत आहे. 'पठाण' आणि 'जवान'नंतर शाहरुखच्या 'डंकी'साठी चाहते उत्सुक आहेत. या सिनेमातून शाहरुख पुन्हा एकदा बॉक्स ऑफिसवर धमाका करणार आहे. सध्या किंग खान 'डंकी' सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. चाहत्यांबरोबरच मराठमोळा अभिनेता रितेश देशमुखही 'डंकी' सिनेमाची आतुरतेने वाट पाहत आहे. 

शाहरुखच्या 'डंकी' सिनेमासाठी अनेक सेलिब्रिटींनी शुभेच्छा दिल्या आहेत. रितेश देशमुखनेही ट्वीट करत डंकी चित्रपटासाठी आतुर असल्याचं म्हटलं आहे. या सिनेमाची तिकिटंही त्याने बुक केली आहेत. "या वर्षातील माझ्या आवडत्या सिनेमाची तिकिटे बुक केली आहेत...माझा फेव्हरेट शाहरुख ते पण राजकुमार हिराणींच्या चित्रपटात...ख्रिसमस हॉलीडे सेलिब्रेट करण्याचा उत्तम कारण!!!" असं रितेशने ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

किंग खानचा 'डंकी' २१ डिसेंबरला सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. राजकुमार हिराणींनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. शाहरुखबरोबर या सिनेमात तापसी पन्नू,विकी कौशल यांच्या मुख्य भूमिका आहेत. या सिनेमाच्या ॲडव्हान्स बुकिंगलाही सुरुवात झाली आहे. ॲडव्हान्स बुकिंगमधून शाहरुखच्या 'डंकी'ने प्रदर्शनाआधीच  कोटींची कमाई केली आहे. 

टॅग्स :शाहरुख खानडंकी' चित्रपटरितेश देशमुख