Join us

स्पृहा जोशीचे हे स्वप्न उतरलं सत्यात, सोशल मीडियावर केला आनंद व्यक्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2021 16:58 IST

स्पृहा जोशीच्या या पोस्टवर चाहते लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहेत.

मराठी चित्रपटसृष्टीतील गुणी आणि प्रतिभावंत अभिनेत्री म्हणून स्पृहा जोशीची ओळख आहे. आपल्या अभिनयाने स्पृहाने रसिकांची मनं जिंकली आहेत. 'मोरया', 'पैसा पैसा' यासह विविध चित्रपटातील भूमिकांमधून स्पृहाने आपल्या अभिनयाची छाप पाडली. स्पृहा जोशी सोशल मीडियावर सक्रीय असून बऱ्याचदा ती फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. तसेच ती कवितादेखील शेअर करत असते. नुकतीच तिने एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यात तिने तिचे स्वप्न पूर्ण झाल्याचे सांगितले आहे. 

स्पृहा जोशी हिने इंस्टाग्रामवर फोटो शेअर करत लिहिले की, स्वप्न सत्यात उतरले! मला नेहमी दाक्षिणात्य सिनेइंडस्ट्रीत काम करायचे होते. तिथल्या कामाच्या पद्धती, नियम आणि प्रोफेशनलिज्मबद्दल ऐकले होते. आणि ही संधी चालून आली. मी माझी पहिली तेलगू  एका नावजलेल्या ब्रॅण्ड जाहिरातीचे चित्रीकरण केले. उत्कर्ष भारद्वाज माझी यासाठी निवड केल्याबद्दल आभारी आहे. बॉस लेडी रोशनी चंद्रा यांनी दिग्दर्शन केले आहे. ही आनंदी व्यक्ती निशांक वर्मा माझ्यासोबत होता. आम्ही एकत्र नवीन भाषेसाठी स्ट्रगल केला आहे. योग्य उच्चारासाठी प्रयत्न केला आहे आणि आमचा लूक हा बेस्ट पार्ट होता. पहिले नेहमी खास असते. त्यामुळे याची माझ्या हृदयात खास जागा असणार आहे. नेहमीसाठी.

स्पृहा जोशी कलर्स मराठीवर सूर नवा ध्यास नवा - स्वप्न सूरांचे, स्वप्न सार्‍यांचे या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करत असून तिचे सूत्रसंचालन प्रेक्षकांना चांगलेच भावत आहे. याआधीच्या सिझनमध्ये देखील तिने सूत्रसंचालकाची भूमिका बजावली होती. तसेच ती रंगबाज या वेबसीरिजमध्ये झळकली आहे.

टॅग्स :स्पृहा जोशी