Join us
Daily Top 2Weekly Top 5

असे झाले अवधूतचे स्वप्न पूर्ण

By admin | Updated: September 30, 2016 03:34 IST

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याचे देशासहित परदेशातदेखील तमाम चाहते आहेत. सचिनची एक झलक पाहण्यासाठी त्याचे चाहते आतूर असतात. सचिनला भेटणे हे सगळ्यांचे स्वप्न असते.

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याचे देशासहित परदेशातदेखील तमाम चाहते आहेत. सचिनची एक झलक पाहण्यासाठी त्याचे चाहते आतूर असतात. सचिनला भेटणे हे सगळ्यांचे स्वप्न असते. हे स्वप्न सत्यात उतरले आहे, ते संगीतकार अवधूत गुप्तेचे. नुकताच अवधूतने सचिनसोबतचा फोटो सोशल मीडियावर अपलोड केला आहे. या फोटोच्याखाली अवधूतने भूतलावर साक्षात देव अवतरला, असे लिहिले आहे. अवधूतच्या या फोटोला सोशल मीडियावर भरभरून लाइक्स येता आहेत. या फोटोला अभिनेता सुयश टिळकनेदेखील कमेंट केली आहे, तर अवधूतच्या एका चाहत्याने तर अनमोल फोटो, अशी कमेंट दिली आहे.