Join us

पुन्हा शूट होणार ‘डॉली की डोली’

By admin | Updated: November 19, 2014 09:02 IST

अरबाज खानची निर्मिती असलेल्या ‘डॉली की डोली’ या चित्रपटाचे शूटिंग पुन्हा केले जाणार आहे.

अरबाज खानची निर्मिती असलेल्या ‘डॉली की डोली’ या चित्रपटाचे शूटिंग पुन्हा केले जाणार आहे. अभिषेक डोगराचे दिग्दर्शन असलेल्या या चित्रपटात सोनम कपूर, राजकुमार राव, पुलकित सम्राट आणि वरुण शर्मा मुख्य भूमिकेत आहेत. सूत्रांनी सांगितले की, जेव्हा निर्मात्यांनी या चित्रपटाचे शूटिंग पाहिले तेव्हा त्यांना वाटले की, चित्रपटातील काही सीन पुन्हा शूट करण्याची गरज आहे. त्यामुळे गाण्यांचे शूटिंग करताना हे सीन्सही शूट केले जाणार आहेत. निर्माता अरबाज खानने सांगितले की, ‘प्रोजेक्ट अद्याप पूर्ण झालेले नाही. अजूनही प्रमोशनल गाणे आणि इतर दोन गाण्यांचे शूटिंग होणे बाकी आहे.’