Join us
Daily Top 2Weekly Top 5

तुम्हाला यशस्वी व्हायचंय? मग ऐका बिग बींचा सल्ला!!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2020 18:07 IST

त्यांनी एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. ज्यातून ते चाहत्यांना यशस्वी होण्याचा मूलमंत्र देताना दिसत आहेत.

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन आणि सोशल मीडिया यांचे आता घट्ट नाते तयार झाले आहे. बिग बी त्यांच्या आयुष्यातील प्रत्येक छोट्या-मोठ्या गोष्टी त्यांच्या फॉलोअर्ससोबत शेअर करत असतात. अशातच त्यांची कोरोनासारख्या महाभयंकर आजारातून सुटका झालीय. आता मात्र, त्यांनी एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. ज्यातून ते चाहत्यांना यशस्वी होण्याचा मूलमंत्र देताना दिसत आहेत. तुम्हाला उत्सुकता असेलच काय आहे तो सल्ला? तर वाचा...

सोशल मीडियावर बिग बी प्रचंड सक्रिय असतात. ऑनलाईन ब्लॉग्स, फोटो आणि व्हिडीओजच्या माध्यमातून ते कायम चर्चेत असतात. यावेळी ते एका ट्विटमुळे चर्चेत आहेत. या ट्विटद्वारे त्यांनी आपल्या चाहत्यांना यशस्वी होण्याचा मार्ग सांगितला आहे. त्यांचं हे ट्विट सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. त्यांनी एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोमध्ये दोन मक्याचे कणीस दिसत आहेत. यामधील एक कणीस कच्चं आहे तर दुसरं भाजलेलं आहे. कच्च्या कणीसाची किंमत पाच रुपये आहे. तर भाजलेल्या कणीसाठी किंमत २० रुपये आहे. या फोटोचं उदाहरण देऊन बिग बींनी आपल्या चाहत्यांना यशस्वी होण्याचा मार्ग सांगितला आहे. ‘जर आयुष्यात यशस्वी व्हायचं असेल तर या मक्याच्या कणीसाप्रमाणे तुम्हाला मेहनतीच्या आगीत स्वत:ला झोकून द्यावं लागेल.’ अशा आशयाचं ट्विट बिग बींनी केलं आहे. त्यांचं हे ट्विट सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.

यापूर्वी अमिताभ ‘कौन बनेगा करोडपती’ या शोमुळे चर्चेत होते. बिग बी ‘कौन बनेगा करोडपती’च्या सेटवर परतले आहेत. लॉकडाऊनच्या काळात अमिताभ यांनी घरीच केबीसीसाठी नोंदणीचे आवाहन करणाऱ्या  प्रोमोचे चित्रण केले होते. मालिकांच्या चित्रीकरणाला परवानगी देण्यात आल्यानंतरही ६५ वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या कलाकारांना चित्रीकरणात सहभाग घेण्यास निर्बंध घालण्यात आले होते. मात्र उच्च न्यायालयाने याप्रकरणीचे निर्बंधही रद्द केल्याने आता सगळेच अडथळे दूर होऊन केबीसीच्या सेटवर परतणे अमिताभ यांना शक्य झाले आहे. दरम्यान बिग बींनी सेटवरील काही फोटो देखील पोस्ट केले आहेत.

टॅग्स :अमिताभ बच्चनट्विटर