Join us  

फोटोतील या चिमुरडीला ओळखलंत का?, मराठी कलाविश्वातील आहे प्रसिद्ध अभिनेत्री

By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2024 9:26 AM

एका अभिनेत्रीच्या बालपणीचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. या फोटोतील या अभिनेत्रीला ओळखलंत का?

कलाकार बऱ्याचदा सोशल मीडियावर त्यांच्या बालपणीचे फोटो शेअर करत असतात. त्यांच्या चाहत्यांनादेखील त्यांच्या खासगी आयुष्याबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता असते. त्यामुळे सेलिब्रेटींच्या बालपणींच्या फोटोंना पसंतीदेखील मिळते. नुकताच मदर्स डे साजरा करण्यात आला. त्यानिमित्ताने अनेकांनी सोशल मीडियावर आपल्या आईसोबतचे बालपणीचे फोटो शेअर केले होते. तसेच एका अभिनेत्रीच्या बालपणीचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. या फोटोतील ही अभिनेत्री कोण आहे, हे ओळखलंत का?, ही चिमुरडी दुसरी तिसरी कुणी नसून अभिनेत्री मृण्मयी देशपांडे (Mrunmayee Deshpande) आहे.

अभिनेत्री मृण्मयी देशपांडे हिने इंस्टाग्रामवर मदर्स डेच्या निमित्ताने आईसोबतचा बालपणीचा फोटो शेअर केला आहे. या फोटोत ती खूपच गोड दिसते आहे. तिने हा फोटो शेअर करत लिहिले की, आई… सगळं या शब्दा पासून सुरु होतं.. आणि तिथेच येऊन संपतं…. मृण्मयीच्या या फोटोला चाहत्यांची पसंती मिळताना दिसत आहे. काहींनी पोस्टवर तू आईसारखी दिसते असे म्हटलंय. तर एका युजरने तुझी आई किती सुंदर दिसते असे लिहिले आहे. 

वर्कफ्रंटअभिनेत्री मृण्मयी देशपांडेच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर ती नुकतीच स्वरगंधर्व सुधीर फडके या सिनेमात झळकली. यात तिने बाबूजींच्या सहचारणी आणि गायिका ललीताबाई यांची भूमिका साकारली आहे. हा चित्रपट १ मे रोजी प्रदर्शित झाला. या चित्रपटाला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळतो आहे. तसेच ती मुंबई डायरिजच्या दुसऱ्या सीझनमध्येही पाहायला मिळाली होती. यात तिने साकारलेली डॉक्टर सुजाता प्रेक्षकांना खूप भावली. 

टॅग्स :मृण्मयी देशपांडे