Join us  

फुकटचा माज मला दाखवू नका - कंगना राणौत

By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2019 4:35 AM

कंगना राणौतचा ‘मणिकर्णिका - द क्वीन ऑफ झांसी’ हा चित्रपट सध्या चर्चेत आहे.

मुंबई : कंगना राणौतचा ‘मणिकर्णिका - द क्वीन ऑफ झांसी’ हा चित्रपट सध्या चर्चेत आहे. चित्रपटात राणी लक्ष्मीबाईंची प्रतिमा मलिन करण्यात आल्याचा आरोप करत करणी सेनेकडून या चित्रपटाला जोरदार विरोध करण्यात येत आहे. या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारणाऱ्या कंगना राणौतलाही लक्ष्य करण्यात येत आहे. कंगनाने माफी मागावी, अशी मागणी करणी सेनेकडून करण्यात येत आहे. मात्र तिने ही मागणी धुडकावून लावत, फुकटचा माज मला दाखवू नका, असे करणी सेनेला सुनावले आहे.‘करणी सेनेकडून येणाºया धमक्यांना मी घाबरणारी नाही. मीसुद्धा रजपूत आहे; आणि माझ्या मार्गात आलेल्या एकालाही सोडणार नाही,’ असा धमकीवजा इशाराच तिने यापूर्वी दिला होता. त्यानंतर कंगनाने माफी मागावी, अशी मागणी करणी सेनेने केली. मात्र, तिने ती धुडकावली. ‘माझी चूक नसेल तर मी माफी मागत नाही. चित्रपटात काही चुकीचे नाही. याबद्दल सर्वांनाच आम्ही आश्वस्त केले आहे. करणी सेनेनेही चित्रपटाला सहकार्य केले पाहिजे. फुकटचा माज मला कुणीही दाखवू नये. मी इथे कुणाची माफी मागण्यासाठी नाही,’ असे कंगनाने म्हटले आहे.करणी सेनेने ‘मणिकर्णिका’च्या रीलीजला विरोध केला आहे. करणी सेनेच्या महाराष्ट्र शाखेने चित्रपटावर आक्षेप घेत निर्मात्यांना पत्र पाठविले. चित्रपटात राणी लक्ष्मीबार्इंची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. चित्रपटात एका गाण्यात राणी लक्ष्मीबार्इंना नृत्य करताना दाखविले आहे. हे सभ्यतेला धरून नसल्याचा करणी सेनेचा आरोप आहे. चित्रपटात काही आक्षेपार्ह दृश्ये दाखविली गेलीच तर मात्र निर्मात्यांना याचे वाईट परिणाम भोगावे लागतील, असा इशारा या पत्रातून दिला आहे. या वादादरम्यान कंगनालाही करणी सेनेकडून धमक्या येत असल्याचे समजते. मात्र तिने करणी सेनेविरोधात तिनेही आक्रमक पवित्रा घेतला आहे.

टॅग्स :कंगना राणौत