Join us  

पुन्हा 'ब्रा'ची चर्चा; अभिनेत्रीने अंतर्वस्त्र न घालताच केलं फोटोशूट

By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2021 5:14 PM

बॉलिवूडची ही अभिनेत्री चित्रपटांपेक्षा बोल्ड फोटोंमुळे येते जास्त चर्चेत

बॉलिवूड अभिनेत्री आयशा शर्मा अभिनेत्री नेहा शर्माची बहीण आहे. आयशा बहिणीसारखीच खूप बोल्ड आणि ग्लॅमरस आहे. ग्लॅमरस फोटोंमुळे या दोघी बहिणी चर्चेत येत असतात. मात्र आता आयशा शर्मा खूप चर्चेत आली आहे. याचे कारण म्हणजे तिने अंतर्वस्त्र न घालताच फोटोशूट केले आहे. त्यामुळे तिचे हे फोटो व्हायरल होताना दिसत आहेत. 

आयशा शर्माने स्काय ब्लू रंगाच्या जम्पसूटमधील बोल्ड फोटोशूट सोशल मीडियावर शेअर केले आहे. यात तिने अंतर्वस्त्र घातले नसून जम्पसूटचे बटणदेखील लावलेले नाही. त्यामुळे तिच्या या फोटोंवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होताना दिसतो आहे.

काहींना तिचा हा फोटो आवडला आहे तर काहींनी तिला या फोटोंवरून ट्रोल केले आहे. आयशा शर्माने असे फोटोशूट पहिल्यांदा केलेले नाही. यापूर्वी तिने व्हाइट रंगाच्या शर्टमध्ये आणि हिरव्या रंगाच्या टॉपमध्येही बोल्ड फोटोशूट केले आहे. आय़शा फिटनेस फ्रिक असून बऱ्याचदा ती सोशल मीडियावर जिममधील फोटो शेअर करत असते.

आयशा शर्माने  जॉन अब्राहमचा चित्रपट 'सत्यमेव जयते'मध्ये काम केले आहे. या चित्रपटातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे.

आयशा बॉलिवूड अभिनेत्री नेहा शर्माची सख्खी बहीण आहे. नेहा शर्माने 'क्या सुपर कूल है हम'. 'यंगिस्तान' आणि 'यमला पगला दिवाना २' सारख्या चित्रपटात काम केले आहे.

टॅग्स :नेहा शर्माजॉन अब्राहम