ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १७ - 'बागी' चित्रपटाच्या सक्सेस पार्टीमध्ये फरहान अख्तर आणि श्रध्दा कपूरने एकत्र केलेला डान्स बॉलिवुडमध्ये चर्चेचा विषय ठरला आहे. मागच्या आठवडयात 'बागी' ची सक्सेस पार्टी झाली. त्यावेळी फरहान आणि श्रध्दाने तिथे उपस्थित असलेल्यांना लाजवेल असा 'डर्टी डान्स' केल्याचे वृत्त मुंबई मिररने दिले आहे.
या पार्टीला श्रध्दाचे आई-वडीलही आले होते. शक्ती कपूरने पार्टीमधून काढता पाय घेताच श्रध्दाने फरहान बरोबर डान्सला सुरुवात केली. डान्समधील दोघांच्या मादक, उत्तेजक अदा बघून फरहानचे श्रध्दाबरोबर सूत जुळल्याची चर्चा सुरु झाली आहे.
फरहानच्या आगामी 'रॉक ऑन २' मध्ये श्रध्दा कपूर आहे. काही महिन्यांपूर्वी फरहान आणि अधुना अख्तरने विभक्त होत असल्याची घोषणा केली. त्यावेळी दोघांच्या विभक्त होण्याचे नेमके कारण काय ? याची चर्चा सुरु झाली होती. आता दोघांच्या विभक्त होण्यामागे श्रध्दा कपूर असल्याची चर्चा आहे.