Join us  

सुशांत सिंग राजपूतचा शेवटचा चित्रपट 'दिल बेचारा'बद्दल मोठं अपडेट, सिक्वेलवर दिग्दर्शक म्हणाला...

By ऑनलाइन लोकमत | Published: May 09, 2024 12:25 PM

दिग्दर्शक मुकेश छाब्रा यांनी  'दिल बेचारा' सिनेमाचा सिक्वल येणार की नाही, हे स्पष्ट केलं आहे. 

दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतचा शेवटचा चित्रपट 'दिल बेचारा' २०२० साली प्रदर्शित झाला. ओटीटीवर प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांकडून मोठा प्रतिसाद मिळाला होता. आता या चित्रपटाचा सिक्वेलबद्दल मोठं अपडेट समोर आलं आहे.  दिग्दर्शक मुकेश छाब्रा यांनी  'दिल बेचारा' सिनेमाचा सिक्वल येणार की नाही, हे स्पष्ट केलं आहे. 

'दिल बेचारा' हा मुकेश छाब्रा यांचा दिग्दर्शकीय पदार्पण चित्रपट होता. जानेवरी महिन्यात त्यांनी 'दिल बेचारा'चा सीक्वल बनवण्याचे संकेत दिले होते. त्यांनी ट्विवटरवर 'दिल बेचारा 2' असं पोस्ट केलं होतं. तेव्हापासून सुशांतच्या चाहत्यांना 'दिल बेचारा 2' प्रदर्शित होणार का? सुशांतच्या जागी कोणता अभिनेता दिसणार? असे अनेक प्रश्न पडले होते. अखेर या प्रश्नांची उत्तरे खुद्द मुकेश यांनी दिली आहेत. 

न्यूज18 शी बोलताना सिक्वेलवर ते म्हणाले, 'तो चित्रपट मी कधीच करणार नाही. होय, मी याबद्दल ट्विट केलं होतं.  कारण मी 'दिल बेचारा 2' बनवण्याचा विचार करत होतो. 'दिल बेचारा' हा माझ्यासाठी खूप खास चित्रपट आहे. कारण त्याच्याशी खूप भावना जोडल्या गेल्या आहेत आणि अर्थातच सुशांत. त्यामुळे त्या चित्रपटाला हात लावू नये हे माझ्या लक्षात आलं'.

सुशांतची आठवण काढत ते म्हणाले, 'मला सुशांतसोबत आणखी तीन-चार चित्रपटांमध्ये काम करायचं होतं. ते माझं स्वप्न होतं. पण तस झालं नाही. आपण नशिबाला हरवू शकत नाही. सुशांतसोबत घालवलेला प्रत्येक क्षण मला आठवतो. तो माझ्या आईसोबत बसून जेवल्याचं आठवतं. आता ते दोघेही राहिले नाहीत. मी त्या दोघांसोबतचा नाश्ता खूप मिस करतो'.

सुशांत सिंह राजपूत याचे १४ जून २०२० रोजी  निधन झाले. मुंबईतील बांद्रा येथील निवासस्थानी त्याने गळफास घेत आत्महत्या केली होती. सुशांतच्या मृत्यूने चाहत्यांना मोठा धक्का बसला होता. सुशांतच्या निधनाच्या एक महिन्यानंतर म्हणजे जुलै २०२० मध्ये त्याचा ‘दिल बेचारा’ हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित झाला. या चित्रपटात सुशांतबरोबर संजना सांघीची प्रमुख भूमिका होती. या सिनेमाला सुंशातच्या चाहत्यांनी भरभरुन प्रेम दिलं होतं. 

टॅग्स :सुशांत सिंग रजपूतसेलिब्रिटीबॉलिवूडसिनेमा