८० च्या दशकात रामानंद सागर यांची ‘रामायण’ (Ramayan) मालिका तुफान लोकप्रिय झाली होती. या प्रत्येक व्यक्तिरेखा आणि ती साकारणा-या कलाकारांना आजही प्रेक्षक विसरू शकले नाहीत. अरूण गोविल यांनी साकारलेला ‘राम’आणि दीपिका चिखलियाने साकारलेली ‘सीता’ आजही प्रेक्षकांना लख्ख आठवते. अनेक जण आजही अरूण गोविल यांना ‘राम’ तर दीपिका चिखलिया (Dipika Chikhlia) हिला ‘सीता’ म्हणूनच ओळखतात.दीपिकाला लोक आजही देवी मानतात. त्यामुळेच जेव्हा दीपिकाने तिचा वन-पीस ड्रेसमधील फोटो सोशल मीडियावर शेअर केला तेव्हा यूजर्सनी वेगवेगळ्या पद्धतीने कमेंट्स करायला सुरुवात केली.
दीपिकाने इन्स्टाग्राम अकाऊंटवर ऑलिव ग्राीन रंगाच्या वनपीस ड्रेसमधला फोटो शेअर केला आहे. या फोटोत दीपिका सोफावर बसलेली दिसतेय. अभिनेत्रीने तिच्या गळ्यात स्कार्फ आणि हायहील्स सँडल घातल्या आहेत. या फोटोत दीपिका खूपच ग्लॅमरस दिसत आहे. हा फोटो शेअर करत दीपिकाने कॅप्शनमध्ये चाहत्यांसाठी प्रार्थना केली आहे. 'आज तुम्हाला जे हवे आहे त्यात तुम्हाला आनंद आणि यश मिळो.'
‘रामायण’ या मालिकेनंतर दीपिकाने नंतर ‘विक्रम वेताळ’, ‘लव कुश’ या मालिकांमध्येही काम केले. 1991 मध्ये ती राजकारणातही आली. ‘रामायण’मुळे मिळालेल्या लोकप्रियतेच्या लाटेवर स्वार होत त्यांनी 1991 मध्ये लोकसभेची निवडणूक जिंकली. पण, काही वर्षांनी तिने राजकारणालाही रामराम ठोकला.