‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’ या चित्रपटानंतर शाहरूख-काजोल यांची जोडी पुन्हा पडद्यावर एकत्र दिसणार होती. म्हणून त्यांचे चाहते आवडत्या जोडीला एकत्र पाहण्यासाठी उत्सुक होते, पण या वातावरणात स्वत:चे वेगळे अस्तित्व सिद्ध करायचे म्हणजे कौशल्यच पणाला लावण्यासारखे आहे. अशी परिस्थिती वरुण धवन आणि क्रिती सनॉन यांची झाली. वरुण यावर म्हणतो की,‘ खरं तर ‘दिलवाले’ हा चित्रपट साकारणे म्हणजे माझ्या करिअरसाठी रिस्कच होती. कारण यासाठी मी खूपच मेहनत घेतली होती. मला कौटुंबिक चित्रपट बघायला आवडतात, ज्यात तुम्ही हसता, रडता, चांगल्या अॅक्शन्स पाहता, चांगली गाणी पाहता. प्रेक्षकांप्रमाणे मलाही असे चित्रपट पहायला आवडतात.’
‘दिलवाले’ माझ्या करिअरसाठी रिस्की - वरुण
By admin | Updated: December 22, 2015 01:45 IST