शुक्रवारी प्रदर्शित झालेल्या ‘बाजीराव मस्तानी’ आणि ‘दिलवाले’ या दोन्ही चित्रपटांबाबत प्रेक्षकांच्या अपेक्षा खूपच वाढल्या होत्या; पण चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर पहिल्याच दिवशी मिळालेला प्रतिसाद पाहता ही अपेक्षा पूर्ण झाली नाही, हे दिसते. असे का झाले? याबाबतच्या कारणांकडे दुर्लक्ष केले जाऊ शकत नाही.प्रथम आपण ‘बाजीराव मस्तानी’बाबत विचार करू. भन्साळी यांनी पडद्यावर स्वत:तील प्रतिभा दाखविण्यात कोणतीही कसर सोडली नाही; पण इतिहास आणि चित्रपट यातील संतुलन ते ठीक रीतीने राखू शकले नाहीत. विशेष करून मध्यांतरानंतर क्लायमॅक्सपर्यंत चित्रपटाचा पाया ढासळत गेला आणि तो फिसकटला. ही बाब प्रेक्षकांना पसंत पडली नाही. भन्साळी यांनी स्वत:ला थोडे सावरले असते, तर त्यांच्या परिश्रमाने हा चित्रपट कुठल्या कुठे गेला असता. तरी पण त्यांनी एक चांगला प्रयत्न केला. त्यात ते पूर्णपणे यशस्वी ठरले नाहीत, हे खरे.आपण ‘दिलवाले’चा विचार करू. हा चित्रपट शाहरूखचा असल्याचे त्याबाबत अधिक निराशा वाटते. एक चित्रपट हिट करण्यासाठी जे काही करायचे ते रोहित शेट्टी यांनी केले आहे. त्यामुळे त्यांच्याबद्दल तक्रार करता येत नाही. त्यात त्यांनी आपल्या फॉर्म्युल्याची पुनरावृत्ती केली आहे. ही बाब एखाद्या दिग्दर्शकासाठी चांगली समजली जात नाही.या चित्रपटाच्या कथेत शाहरूखला काय दिसले? त्यात तो काम करण्यास तयार झाला, हा सरळ सवाल शाहरूखला विचारला जाऊ शकतो. रोहित शेट्टीच्या तुलनेत शाहरूखचा अनुभव चांगला आहे. चित्रपटाचा पहिला शो पाहूनच त्यातील दोष प्रेक्षकांच्या ध्यानात आले. असे असताना एवढा अनुभव असूनही शाहरूखला त्यातील दोष कसे दिसले नाहीत? आपल्या नावावर प्रेक्षक हा चित्रपट स्वीकारतील, असा अति आत्मविश्वास शाहरूखला होता काय, असा प्रश्न येथे निर्माण होतो. हा चित्रपट त्याचा भ्रम निश्चितच दूर करील. अशा अत्यंत ‘वाह्यात’ चित्रपटात शाहरूखसारखा स्टार काम करतो, ही खेदाची बाब आहे.एखादा नवीन कलाकार आपल्या करिअरमध्ये संघर्ष करीत असेल, तर असे चित्रपट स्वीकारण्याचा धोका पत्करतो. त्यातून त्या कलाकाराची मानसिकता समजून येते. मनोरंजनाच्या नावावर त्याच्याच कंपनीने इतका दुर्बल चित्रपट काढावा? आणि त्यात शाहरूखने स्वत:च काम करावे, हे पटत नाही. मनोरंजन करणाऱ्या चित्रपटात त्याने काम करू नये, असे नाही.रोहित शेट्टीनेच त्याच्या कंपनीसाठी ‘चेन्नई एक्स्प्रेस’ बनविला होता. तो फार ग्रेट चित्रपट नव्हता; पण त्यात मनोरंजन आणि मसाला भरपूर होता. शाहरूखनेच ‘चेन्नई एक्स्प्रेस’नंतर ‘हॅप्पी न्यू ईअर’ बनविला होता. या चित्रपटाने बॉक्स आॅफिसवर भलेही कमाई केली असेल; पण ‘दिलवाले’प्रमाणेच तो कमजोर चित्रपट होता.फरहा खान आणि रोहित शेट्टी यांसारखे निर्देशक शाहरूखसारख्या स्टारच्या स्टारडमबाबत छेडछाड करीत असतील, तर त्यात शाहरूखचाच जास्त दोष दिसतो. अशा चित्रपटात काम करणे हा त्याचाच दोष आहे. अनुभव माणसाला परिपक्व बनवितो. यश कोणालाही चांगले काम करण्यासाठी प्रेरणा देते. ‘माय नेम इज खान’, ‘स्वदेस’, ‘चक दे इंडिया’ यांसारख्या चित्रपटांत काम केल्यानंतर आता त्याने मसाला चित्रपटांतून बाहेर पडून काही चांगल्या चित्रपटांत काम करण्याची अपेक्षा केली जाऊ शकते; पण ‘हॅप्पी न्यू ईअर’, ‘दिलवाले’ यांसारख्या चित्रपटांनी अपेक्षाभंग झाला आहे. चित्रपटांतून पैसा खूप मिळविला, आता टॅलेंटसाठी लक्षात राहणाऱ्या चित्रपटांत काम कर, असा सल्ला विधू विनोद चोप्रा यांनी शाहरूखला दिला होता. ‘हॅप्पी न्यू ईअर’, ‘दिलवाले’ चित्रपट पाहिल्यानंतर शाहरूखसाठी हा सल्ला अगदी योग्य वाटतो.
आशा-निराशेच्या भोवऱ्यात झुलणारे ‘दिलवाले’-‘बाजीराव मस्तानी’चे यश
By admin | Updated: December 21, 2015 01:24 IST