Join us
Daily Top 2Weekly Top 5

इंग्रजी बोलता येत नसल्याने या अभिनेत्याने दिली नव्हती प्रसिद्ध मासिकाला मुलाखत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2021 17:21 IST

या अभिनेत्याने गेल्या काही वर्षांत बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये त्याची एक ओळख निर्माण केली आहे.

ठळक मुद्देदिलजीतने गेल्या अनेक वर्षांत पंजाबी आणि बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये त्याची एक ओळख निर्माण केली आहे. त्याच्या याच प्रसिद्धीमुळे Vogue मासिकाने त्याला मुलाखतीसाठी विचारले होते. इतके मोठे मासिक आपली मुलाखत घेणार हे कळल्यावर तो प्रचंड खूश झाला होता.

दिलजीत दोसांझने पंजाबी तसेच अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केले आहे. तो एक खूप चांगला अभिनेता असण्यासोबतच एक खूप चांगला गायक देखील आहे. एखादा अभिनेता म्हटला की, तो फाडफाड इंग्रजी बोलत असणार असेच आपल्याला वाटते. पण दिलजीतचे इंग्रजी चांगले नसल्याने तो एका प्रसिद्ध मासिकाला मुलाखत न देताच परत आला होता. 

दिलजीतने गेल्या अनेक वर्षांत पंजाबी आणि बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये त्याची एक ओळख निर्माण केली आहे. त्याच्या याच प्रसिद्धीमुळे Vogue मासिकाने त्याला मुलाखतीसाठी विचारले होते. इतके मोठे मासिक आपली मुलाखत घेणार हे कळल्यावर तो प्रचंड खूश झाला होता. ही घटना २०१९ मधील आाहे. दिलजीत Vogue मासिकाच्या कव्हर पेजवर झळकला होता. या मासिकाच्या कव्हर पेजवर झळकण्याचा मान आतापर्यंत करीना कपूर, करण जौहर,  नताशा पुनावाला यांसारख्या सलिब्रेटींना मिळाला आहे. फोटोसोबतच या मासिकाने दिलजीतची मुलाखत घेण्याची इच्छा व्यक्त केली होती. पण त्याने या गोष्टीस नकार दिला होता. 

बीबीसी एशियन नेटवर्कला दिलेल्या मुलाखतीत दिलजीतने सांगितले की, माझे इंग्रजी खूपच वाईट होतं. त्यामुळे मी एका मुलाखतीस नकार दिला होता.  Vogue मासिकाच्या कव्हर पेजसाठी फोटो काढण्यासाठी मला लंडनला बोलावले होते. मी या गोष्टीमुळे खूप खूश झालो होतो. आणि मी जायला निघालो. पण तिथे माझी मुलाखत घेणार हे कळल्यावर माझ्या पायाखालची जमीन सरकली होती. मुलाखत घ्यायचे हे कळल्यावर मी तिथून निघून आलो होतो. 

दिलजीतला लहानपणापासूनच गायनाची आवड होती. तो खूप लहान असल्यापासूनच गुरुद्वारामध्ये किर्तन गायचा. त्याने पंजाबी म्युझिक व्हिडिओद्वारे त्याच्या अभिनयप्रवासाला सुरुवात केली. त्याने उडता पंजाब, वेलकम टू न्यूयॉर्क, फिल्लोरी यांसारख्या अनेक हिंदी चित्रपटांमध्ये काम केले आहे. सध्या तो सोशल मीडियावर चांगलाच प्रसिद्ध आहे. त्याच्या प्रत्येक ट्वीटवर सोशल मीडियावर चर्चा रंगते.

 

टॅग्स :दिलजीत दोसांझ