Join us
Daily Top 2Weekly Top 5

अभिनेत्री मयुरी वाघच्या मेहेंदीचे फोटो पाहिलेत का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2017 10:04 IST

'अस्मिता'फेम अभिनेत्री मयुरी वाघ आणि पियुष रानडे लवकरच विवाहबद्ध होणार आहेत. तिच्या मेहेंदीचे काही खास फोटो आम्ही तुमच्यासाठी आणले आहेत.

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ३१ - 'रील' लाईफमध्ये एकत्र काम करताना प्रेमात पडून 'रिअल' लाईफ जोडीदार बनल्याची अनेक उदाहरणे मनोरंजनसृष्टीत आहेत. अगदी अमिताभ-जया बच्चन, धर्मेंद्र- हेमामालिनी पासून ते मराठी अभिनेत्री श्रुती मराठे- गौरव घाटणेकर पर्यंत.. एकमेकांसोबत काम करता करता हे सर्वजण ख-या आयुष्यातही जोडीदार बनले आहेत. त्या यादीत आता आणखी एका नावाची भर पडणार आहे, ती जोडी आहे 'अस्मिता' फेम अभिनेत्री मयुरी वाघ आणि पियुष रानडे यांची.. या दोघांच्या साखरपुड्याची बातमी 'लोकमत'नेच सर्वप्रथम तुम्हाला सांगितली होती आणि आता लवकरच ते लग्नबंधनातही अडकणार आहेत. या आठवड्यातच मयुरी आणि पियुष विवाहबद्ध होत असून त्यांचे लग्न बडोद्यात पार पडणार आहे. अगदी पारंपारिक रितीरिवाजाने त्यांचा विवाह होणार आहे. 
(VIDEO : अस्मिता-अभिचा झाला साखरपुडा)
  •  
 
मयुरीची मेहेंदी नुकतीच पार पडली. भरपूर वर्क केलेल्या, गुलाबी रंगाच्या ड्रेसमध्ये मयुरीचे सौंदर्य आणखीनच खुलून दिसत होते. तिच्या मेहेंदीचे हे काही खास फोटो तुमच्यासाठी....