सध्या मराठी छोट्या पडद्यावर वेगवेगळ्या जॉनरच्या मालिका प्रसारीत होत आहेत. त्यापैकी एक आईचं महत्त्व सांगणारी आणि कौटुंबिक नात्यावर भाष्य करणारी मालिका आहे ती म्हणजे आई कुठे काय करते (Aai Kuthe Kay Karte). या मालिकेला कमी कालावधीत प्रेक्षकांची पसंती मिळाली. मालिकेच्या कथानकालाच नाही तर त्यातील सर्वच पात्रांना प्रेक्षकांची पसंती मिळाली. मात्र या मालिकेतील मुख्य आणि महत्त्वाचे पात्र म्हणजे अरुंधतीने प्रत्येक घरात आपलं स्थान निर्माण केलं. अरुंधतीच्या रिलच नाही तर रिअल लाइफबद्दल जाणून घेण्यासाठी प्रेक्षक उत्सुक असतात. तर अरुंधतीची भूमिका अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर (Madhurani Prabhulkar) हिने साकारली आहे. मधुराणीच्या नवऱ्या आणि लेकीबद्दल सर्वांनाच माहित आहे. मात्र फार कमी लोकांना मधुराणीच्या सख्ख्या बहिणीबद्दल माहित आहे. तिच्या बहिणीचादेखील सिनेइंडस्ट्रीशी संबंध आहे.
अरुंधती उर्फ मधुराणी प्रभुलकरने नुकतेच बहिणीच्या वाढदिवसानिमित्त सोशल मीडियावर बालपणीचा फोटो शेअर करत तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. या फोटोत या दोन गोंडस चिमुकल्या केक कापताना दिसत आहेत. हा फोटो शेअर करत मधुराणीने माझ्या प्रिय बहिणीला वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा असे लिहिले आहे. हा फोटो पाहिल्यानंतर तिचे चाहते तिच्या बहिणीबद्दल जाणून घेण्यासाठी उत्सुक दिसत आहेत. चला तर आपण जाणून घेऊयात तिच्या बहिणीबद्दल.
याशिवाय अमृताचे स्वतःचे युट्यूब चॅनेल असून त्यावर बरीच कव्हर साँग्स ऐकायला मिळतील. अमृताला एक मुलगा आणि एक मुलगी अशी दोन मुले आहेत. अमृताच्या सोशल मीडियावरील अकाउंटवर तिचे आणि मधुराणीचे बरेच फोटो पाहायला मिळत आहेत.