Join us  

'चिमणी पाखरं' फेम 'या' चिमुकलीला आता ओळखणं आहे कठीण; पाहा तिचा हा लेटेस्ट फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2024 3:08 PM

Child artist: ही चिमुकली आता मोठी झाली असून तिने विदेशातून तिचं शिक्षण पूर्ण केलं आहे.

पद्मिनी कोल्हापुरे (padmini kolhapure) आणि सचिन खेडेकर (sachin khedekar) यांचा चिमणी पाखरं हा सिनेमा आज अनेकांच्या लक्षात असेल. या सिनेमामुळे असंख्य प्रेक्षकांच्या डोळ्याच्या कडा पाणावल्या होत्या. 2001 साली प्रदर्शित झालेला हा सिनेमा त्याकाळी प्रचंड लोकप्रिय झाला. या सिनेमात चार बालकलाकारही झळकले होते. त्यामुळे हे बालकलाकार आता काय करतात, कसे दिसतात असा प्रश्न अनेकदा प्रेक्षकांना पडतो. त्यामुळेच या सिनेमातील एका चिमुकलीविषयी जाणून घेऊयात.

पद्मिनी, सचिन खेडेकर यांची या सिनेमात मुख्य भूमिका होती. तर, भारती चाटे, अविनाश चाटे, मेघना चाटे आणि निहार शेंबेकर या चिमुकल्यांनी सुद्ध महत्त्वाची भूमिका साकारली होती. त्यामुळेच या सिनेमातील थोरली लेक म्हणजेच भारती चाटे हिच्याविषयी जाणून घेऊयात. भारती आता काय करते ते पाहुयात.

महेश कोठारे दिग्दर्शित 'चिमणी पाखरं' या सिनेमाची निर्मिती चाटे कोचिंग क्लासेसचे सर्वेसर्वा मच्छिंद्र चाटे यांनी केली होती. विशेष म्हणजे त्यांची थोरली लेक भारती चाटे हिनेच या सिनेमात पद्मिनी आणि सचिन यांच्या थोरल्या लेकीची भूमिका साकारली होती. परंतु, या सिनेमानंतर तिने अभिनयापासून फारकत घेतली. त्यामुळे ती सध्या काय करते ते पाहुयात.

भारतीने लंडनमधील इंटरनॅशनल बिझनेसमधून एमबीए केलं आहे. तसंच तिचा मॅनेजिंग प्रॉडक्शन, चित्रपट दिग्दर्शन, स्टोरी टेलिंग या विषयात तब्बल 9 वर्षांचा अनुभव आहे. भारतीने सुरुवातीला माय मराठी या स्टेज शोची धुरा सांभाळली होती. त्यानंतर तिने कोठारे व्हिजनमध्ये एक वर्ष असिस्ंटट डायरेक्टर म्हणूनही काम केलं.

भारतीचं आता लग्न झालं असून तिने आशिष नाटेकर याच्यासोबत लग्न केलं आहे. या जोडीला एक चिमुकली मुलगी सुद्धा आहे. लग्नानंतर भारतीने 'तू का पाटील' आणि 'मेनका उर्वशी'  या चित्रपटांची सहनिर्मिती केली आहे. तसंच सध्या ती आणि तिचा पती आशिष हे त्यांच्या लेकीच्या नावाने ‘सायेशा इंटिग्रेटेड कम्युनिकेशन’ ही स्वतःची निर्मिती संस्था चालवत आहेत. दरम्यान, चिमणी पाखरं या सिनेमात विजय चव्हाण, लक्ष्मीकांत बेर्डे, तुषार दळवी ही कलाकार मंडळी सुद्धा झळकली होती. 

टॅग्स :सिनेमापद्मिनी कोल्हापुरेसचिन खेडेकरलक्ष्मीकांत बेर्डेसेलिब्रिटी