Join us  

रंगमंचावर असलेल्या 'या' 5 मराठी कलाकारांना ओळखलं का? आजही त्यांची मैत्री आहे कायम

By ऑनलाइन लोकमत | Published: September 06, 2023 8:00 AM

Marathi actors: हा फोटो मराठी कलाविश्वातील एका प्रसिद्ध दिग्दर्शकाने शेअर केला आहे.

मराठी कलाविश्वात आज असे अनेक कलाकार आहेत जे गेल्या कित्येक वर्षांपासून एकमेकांचे चांगले मित्र आहेत. विशेष म्हणजे या प्रत्येक कलाकाराने त्यांच्यातील मैत्री आजही टिकवून ठेवली आहे. त्यामुळे केदार शिंदे (kedar shinde), भरत जाधव (bharat jadhav), अंकुश चौधरी (ankush chaudhari), संजय नार्वेकर (sanjay narvekar) यांसारख्या कलाकारांच्या मैत्रीची कायम कलाविश्वात चर्चा रंगत असते. यात दिग्दर्शक केदार शिंदे बऱ्याचदा सोशल मीडियावर जुने फोटो, व्हिडीओ पोस्ट करत या मैत्रीच्या आठवणींना उजाळा देत असतो. यावेळीदेखील त्यांनी एक जुना फोटो शेअर केला आहे.

केदार शिंदे यांनी अलिकडेच फ्रेंडशीप डे निमित्त एक जुना फोटो शेअर केला. या फोटोमध्ये मराठीतील अनेक दिग्गज कलाकार झळकले आहेत. विशेष म्हणजे हे कलाकार आजही एकमेकांचे चांगले मित्र असून त्यांनी मराठी सिनेसृष्टीत त्यांचं अढळ स्थान निर्माण केलं आहे.

'काही गोष्टींची सुरूवात करताना.. आपल्यासोबतचे सवंगडी आपलं जीवन समृद्ध करण्यासाठी महत्वपूर्ण ठरतात. माझ्या आयुष्यातील हीच ती लोकं.. कोण कोण आहेत? ओळखलत तर comments मध्ये सांगा', असं कॅप्शन देत केदार शिंदे यांनी चाहत्यांना या कलाकारांना ओळखायला सांगितलं आहे.

तुम्ही ओळखलं का या कलाकारांना?

केदार शिंदे यांनी  शेअर केलेल्या या फोटोमध्ये भरत जाधव, अंकुश चौधरी, जयराज नायर, अरुण कदम आणि केदार शिंदे आहेत. 

टॅग्स :मराठी अभिनेताअंकुश चौधरीकेदार शिंदेभरत जाधवसेलिब्रिटीसिनेमा