Join us
Daily Top 2Weekly Top 5

धर्मेंद्र यांनी व्हिडिओद्वारे सांगितले त्यांच्या फिटनेसचे रहस्य, व्हिडिओ झाला व्हायरल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2021 17:51 IST

धर्मेंद्र यांनी ट्विटर अकाऊंटला एक व्हिडिओ पोस्ट केला असून या व्हिडिओत ते स्विमिंग पूलमध्ये दिसत आहेत.

ठळक मुद्देहा त्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला असून या वयातही धर्मेंद्र यांचा व्यायाम करतानाचा उत्साह पाहून नेटिझन्स त्यांचे कौतुक करत आहेत.

ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र अभिनयक्षेत्रापासून सध्या दूर असले तरी सोशल मीडियावर चांगलेच सक्रिय असतात. ते त्यांचे फोटो, व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असतात. तसेच सोशल मीडियाद्वारे त्यांच्या चाहत्यांशी संवाद साधत असतात. धर्मेंद्र आजही चांगलेच फिट आहेत. त्यांच्या फिटनेसचे रहस्य काय आहे हे त्यांनी नुकतेच सोशल मीडियाद्वारे सांगितले आहे.

धर्मेंद्र यांनी ट्विटर अकाऊंटला एक व्हिडिओ पोस्ट केला असून या व्हिडिओत ते स्विमिंग पूलमध्ये दिसत आहेत. या पोस्टसोबत त्यांनी लिहिले आहे की, मी योगा आणि काही व्यायामांसोबतच पाण्यातील एरोबिक्स सुरू केला आहे. आरोग्य जपणे हे सगळ्यात महत्त्वाचे आहे.

हा त्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला असून या वयातही धर्मेंद्र यांचा व्यायाम करतानाचा उत्साह पाहून नेटिझन्स त्यांचे कौतुक करत आहेत. 

धर्मेंद्र यांच्या कुटुंबियांतील कोणीच फिल्म इंडस्ट्रीत नव्हते. तसेच या इंडस्ट्रीत त्यांचा कोणीही गॉडफादर देखील नव्हता. पण त्यांनी आपल्या अभिनयाच्या बळावर बॉलिवूडमध्ये आपले एक प्रस्थ निर्माण केले. पंजाबच्या लुधियाना शहरातील नुसराली या गावी धरमसिंग देओल यांचा जन्म झाला. केवल किशनसिंग देओल आणि सत्वंत कौर हे त्यांचे आई-वडील. लुधियानाच्या गव्हर्नमेंट सिनिअर सेकंडरी स्कूल आणि फगवारा येथील रामग्रहीय कॉलेजमध्ये धर्मेंद्र यांनी शिक्षण घेतले. वयाच्या १८ व्या वर्षीच फिल्मफेअर’चा न्यू टॅलेंट अ‍ॅवॉर्ड त्यांनी मिळवला आणि त्यानंतर त्यांनी कधीच मागे वळून पाहिले नाही.

टॅग्स :धमेंद्र