Join us  

भाऊ कदम यांना पाहताच उपमुख्यमंत्री फडणवीसांनी मारली मिठी, व्हिडीओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2023 11:44 AM

नुकतेच एका सोहळ्यात भाऊ कदम आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट झाली.

'चला हवा येऊ द्या'च्या माध्यमातून घराघरात पोहोचलेला लोकप्रिय अभिनेता म्हणजे अर्थात भाऊ कदम. झगमगत्या कलाविश्वात वावरत असतांना स्टारडम मिळत असूनही भाऊने त्याच्यातील साधेपणा जपला आहे. त्यामुळेच आज लोकप्रिय अभिनेत्यांच्या यादीत भाऊ कदमचं नाव आवर्जुन घेतलं जातं. नुकतेच एका सोहळ्यात भाऊ कदम आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट झाली. याचा एक व्हिडीओ समोर आला आहे. 

भाऊ कदम हे सोशल मीडियावर सक्रिय असतात. त्यांनी आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर एक व्हिडीओ शेअर केला. यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आमदार प्रवीण दरेकर दिसत आहेत. भाऊ कदम यांना पाहताच उपमुख्यमंत्री फडणवीसांनी 'अरे भाऊ' म्हणत त्यांना मिठी मारली. शिवाय, 'काय भाऊ कसे आहात?', अशी विचारपूस केली. त्यांच्या या चाहत्यांनी व्हिडीओवर प्रेमाचा वर्षाव केला.

वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाल्यास भाऊ कदम नुकतेच 'क्लब 52'  या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला आले. यात भाऊ कदम यांचा हटके अंदाज पाहायला मिळाला. फू बाई फू', 'चला हवा येऊ द्या' या गाजलेल्या कार्यक्रमांमधून घराघरात पोहोचलेल्या भाऊ कदमने अनेक लोकप्रिय मराठी सिनेमांमध्येही काम केलं आहे. 'पांडू', 'नशीबवान', 'व्हीआयपी गाढव', 'टाईमपास', 'टाईमपास २', 'सायकल' यांसारख्या सिनेमातही ते झळकला आहे. अथक प्रयत्न, मेहनत करुन कलाविश्वात त्याचं हक्काचं स्थान निर्माण केलं आहे. 

टॅग्स :भाऊ कदमदेवेंद्र फडणवीससेलिब्रिटीमराठी अभिनेता